(पिडीत मुलीची आई संशयित आरोपी सोनम हाकिम सिंग)
नवी मुंबई : मा. पोलीस आयुक्त, नवी मुंबई श्री. संजयकुमार यांनी नवी मुंबई हद्दीतील आढळणाऱ्या बेकायदेशीर अवैध कृत्यांना आळा घालण्याबाबत गुन्हे शाखेस सुचना दिलेल्या आहेत.
मा. पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या सुचनांचे अनुशंगाने पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. प्रवीणकुमार पाटील, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा श्री. विनोद चव्हाण यांचे मार्गदर्षनाखाली काम करीत असताना दि. 28/08/2020 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन गरड यांना माहिती मिळाली की, मीरा-भाईंदर येथे राहणारी एका महिलेस सुमारे अठरा वर्षे वयाची तरुण मुलगी आहे, स्वतःच्या मुलीचा यापूर्वी कोणत्याही पुरुषाबरोबर शरीर संबंध झालेला नाही, यासाठी प्रथम संभोग करू इच्छिणा-या ग्राहकाच्या शोधात असल्याबाबत खबरी मार्फत माहिती मिळाली.
सदरची माहिती खबरी मार्फत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांना मिळाल्यानंतर, बनावट ग्राहका मार्फत सदर महिलेबरोबर बोलणे केले असता, तिने प्रथम तिच्याच मुलीच्या प्रथम शरीर संभोगासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. आपापसात बोलणे होऊन सदरचा सौदा एक लाख वीस हजार रुपयांमध्ये ठरविण्यात आला.
दि. 31/08/2020 रोजी पोलिसाच्या बनावट ग्राहकाने शिरवणे गाव नेरूळ येथील हॉटेल कोहिनुर पॅलेस येथे सदर महिलेचा सांगण्यावरून 1 रूम बुक केली. सायंकाळी पाचच्या सुमारास सदर महिला हॉटेलमध्ये तिच्या मुलीला मीरा-भाईंदर येथून इंडिका कारने घेऊन आली. सदर ठिकाणी सदर महिलेबरोबर बनावट ग्राहकाने बोलणे करून आईच्या सांगण्याप्रमाणे मुलीस घेऊन रूम मध्ये गेला. रूम मध्ये सदरची मुलगी प्रथम वेश्यागमनासाठी अर्धनग्न होत असतानाच, बनावट ग्राहकाने पोलिसांना मोबाईल वरून ठरल्याप्रमाणे इशारा करताच, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड व त्यांचे पथकाने, पंचासह सदर ठिकाणी छापा टाकला.
सदर केलेल्या कारवाईमध्ये सदर पिडीत मुलीची आई पोलिसांच्या सापळ्यात सापडली. सदर बाबत नेरुळ पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 228/20 कलम 370 भा.द.वि.सं., सह कलम 4,5 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, मुलीची आई नामे सोनम हाकीम सिंग, वय 40 वर्शे, रा.ठि. जहागिर सर्कल, आर. एन. ए. ब्राॅड वे, बि.नं. ए 16, आर. एन. 102, मिरा रोड (पुर्व) हिला अटक करण्यात आलेली आहे. तसेच पिडित मुलीस सुधारगृहामध्ये पाठविण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस उप-आयुक्त, प्रवीणकुमार पाटील व सहा. पोलीस आयुक्त अजय कदम, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचे प्रत्यक्ष मार्गदर्षनाखाली वपोनिरी/अर्जुन गरड, म.सपोनि/सुनिता भोर, पोहवा/1207 वायकर, पोहवा/114 कोकरे, पोना/1917 कारखेले, पोना/2440 पाटील, पोना/2838 पवार, मपोना/672 धनगर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment