खारघर : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने वतीने धामोळे गाव येथे २५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमच्या वेळी मा.आमदार तथा उत्तर रायगड भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांतजी ठाकूर, मा. कोंकण म्हाडा अध्यक्ष व महाराष्ट्र्र प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाशजी कोळी, खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेशजी पटेल,पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, अ-प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे , प्रभाकर जोशी, नगरसेवक ऍड.नरेश ठाकूर, प्रभाग 3 चे नगरसेवक हरीशजी केणी, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत,सरचिटणीस कीर्ती नवघरे, वैद्यकीय सेल संयोजक किरण पाटील , उपाध्यक्ष रमेश खडकर, उपाध्यक्ष निशा सिंग,महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार मॅडम,उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम, चिटणीस योगिता कडू,मंडल चिटणीस गुरू ठाकूर,प्रभाग ४ अध्यक्ष वासुदेव पाटील , कामगार आघाडी संयोजक गुरुनाथ म्हात्रे,संतोष शर्मा,आर के दिवाकर,विपुल चौतालिया, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, हॅपी सिंग तसेच प्रभाग 3,4 ,5,6 मधील नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रसंगी SBI बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर आर.के.अगरवाल, विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार तसेच बँकेचे हर्षद नेगी व मनस्वी पटेल यांच्यासह अनेक कर्मचारी व अधिकारी या वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित होते.
बँकेचे मॅनेजर अगरवाल यांनी खारघर मधील धामोळे वाडीतील या जागेवर वृक्षारोपण करून काँक्रीट च्या जंगलाच्या बाजूलाच नैसर्गिक जंगलाचे संवर्धन होत आहे याचे कौतुक केले.
या झाडांची नुसते लागवड न करता पुढील वर्षभर या झाडांना पाणी,खत व निगा राखण्याची जबाबदारी सुद्धा घेतली जाईल अशी ग्वाही देण्यात आली.
पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी या उपक्रमाचे स्वागत व कौतुक करताना आज वृक्षलागवड का महत्वाचे आहे तसेच मागील आठवड्यात उत्तर रायगड जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांच्या योगदानाने सेवा सप्ताह कश्या पद्धतीने साजरा केला याची माहिती दिली.तसेच धामोळे वाडीतील सर्व मुलांना मास्क व शैक्षणिक साहित्य सुदधा मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योग आघाडीचे संयोजक राजेंद्र मामा मांजरेकर,सोशल मीडिया सहसंयोजक मोना आडवाणी, प्रदेश सोशल मीडिया सदस्य चांदणी अवघडे, खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष अजय माळी,शुभम सामाजिक सेवाभावी संस्था यांनी विशेष मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी केला.
Comments
Post a Comment