पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य" या महाराष्ट्रातील पैलवानांच्या अग्रणी संस्थेच्या कार्यकारिणीवर पै.अतुल भाऊ जगताप व आप्पासाहेब मगर यांची नियुक्ती जाहिर
देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे पहिलवानांचे आगर मानले जाते.देशाच्या कुस्ती पटलावरती महाराष्ट्रातील अनेक मातब्बर पैलवानांनी राज्याचे आणि स्वतःचे नांव कोरले आहे.१९५२ च्या फिनलंडमध्ये भरलेल्या हेलसिंकी आॕलिंपिकमध्ये पैलवान खाशाबा जाधव यांनी कुस्तीमधील पहिले आॕलिंपिक पदक मीळवून जगात देशाचा दबदबा निर्माण केला होता त्याचबरोबर महाराष्ट्राची मान सन्मानाने ताठ झाली होती.असा हा महाराष्ट्र कुस्तीमध्ये आजही पुढेच आहे.
कोल्हापूर,सातारा,सांगली तसेच रायगडमध्ये आजही अनेक मल्ल मातीशी दोन हात करीत आहेत.त्यांच्या गरजा आणि समस्या वेगवेगळ्या आहेत.त्या सोडविण्यासाठी अनेक संस्था,संघटना तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद कार्यरत आहेत.त्यामध्ये,"पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य" ही संघटना पैलवानांसाठी अहोरात्र मेहनत करीत आहे.नुकतीच या संस्थेच्या कार्यकारिणीवर नविन नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या.
पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पै.मारूती भाऊ जाधव व पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख पै.अजित दादा जाधव व पैलवान ग्रुप रायगड जिल्हा अध्यक्ष पै.रूपेश भाऊ पावशे आणि पैलवान ग्रुप नवी मुंबई अध्यक्ष पै.शशिकांत भाऊ लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पैलवान ग्रुप नवी मुंबई कार्याध्यक्ष पदी ( नॅशनल चॅम्पियन नवी मुंबई पोलिस) पैलवान अतुल भाऊ जगताप व पैलवान ग्रुप नवी मुंबई सोशल मीडिया अध्यक्ष पदी
श्री आप्पासाहेब मगर
(संपादक-जनसभा वृत्तपत्र,
अध्यक्ष-"खारघर पत्रकार संघ,रजि.")
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने दोन्ही नवनियुक्त मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले.
Comments
Post a Comment