Skip to main content

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांची कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा सिडको यांच्याकडे प्रभागातील अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पाणी पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी

 खारघर मधील प्रभाग क्र. ४ मधील से 19,20,21 व 11,13 येथील बहुतांश सोसायटीमध्ये मागील एक महिन्यापासून पाणी पुरवठा हा एकतर कमी दाबाने किंवा मागणी पेक्षा कमी होतांना दिसून येत आहे. सध्य स्थितीत पावसाळा सुरू आहे व तोही मोठया प्रमाणात असतांना पाण्याचा तुटवडा कसा ?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सोसायटीतील पदाधिकारी वेळोवेळी माझ्याकडे लोकप्रतिनिधी या नात्याने आपले प्रश्न ,अडचणी मांडत असतात त्यात प्रामुख्याने माझ्या महिला भगिनींना भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी सदर बाबतीत सहाय्यक अभियंता पाणीपुरवठा विभाग ,खारघर यांना फोन केला की ते किंवा त्यांच्या कार्यालयातील प्रतिनिधी येतात व सदर सोसायटीत आल्यानंतर पाण्याचे मीटर चेक करतात अथवा पाणी पाईपलाईन तपासतात त्यावेळे पुरते पाणी व्यवस्थित येते परत ये रे माझ्या मागल्या असे होतांना दिसून येते.


सोसायटपदाधिकारी यांना खालील प्रकारे आपल्या विभागाकडून सूचना दिल्या जातात


१) आपल्या सोसायटीची पाईपलाईन ही फार पूर्वीची आहे किंवा तिचा व्यास छोटा आहे तो मोठा करून घ्या.


२) पाणीच्या मीटर जवळ घाण अडकली आहे त्यामुळे पाणी कमी येते


३) पाईपलाईन वरती आहे खाली करून घ्या म्हणजे पाणीपुरवठा सुरळीत होईल. 


वरील सर्व प्रकारात काहीतरी गौडबंगाल आहे असे सोसायटीच्या रहिवाश्यांना वाटते कारण 


काही महिन्यांपूर्वी सदर पाईपलाईन मधून सुरळीत पाणीपुरवठा होत होता.


आपल्या विभागामार्फत सांगण्यात येते की पाणीपुरवठा सुरळीत आहे मग तो कुठे गायब होतो सोसायटीत येईपर्यंत हा प्रश्न आहे.


वरील उपाय योजना आपल्या *


खारघर विभागातील अधिकारी अथवा कर्मचारी सुचवतात


या उपाय योजना आहेत की आर्थिक लुबाडणूक असा प्रश्न सोसायटीचे रहिवाशी विचारतात* कारण वर्षानुवर्षे सदर पाईपलाईन मधून व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे मग आत्ताच असे काय झाले ?


माझ्याकडे आलेल्या काही प्रातिनीधिक स्वरुपातील सोसायटीचे नाव ,प्लॉट न व सेक्टर आपल्या माहितीसाठी सोबत जोडत आहे आपण त्वरित लक्ष घालून योग्य त्या उपाय योजना कराव्यात अन्यथा आम्हाला आपल्या दालनासमोर आंदोलन करावे लागेल याची आपण नोंद घ्यावी व आपल्या विभागाकडून सोसायट्यांची होणारी फसवणूक, लुबाडणूक त्वरित थांबवावी.


आमच्या असेही निदर्शनास आले आहे की आपले कर्मचारी मुद्दाम पाण्याचा व्हाल कमी प्रमाणात सोडतात असे भविष्यात आढळून आल्यास त्यांना त्याच ठिकाणी रहिवाशी योग्य ते उत्तर देतील.


 


 


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.