Skip to main content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोखाडा महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन 


 पनवेल(प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय आणि प्रेरणादायी काम करणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पालघर जिल्हयातील मोखाडा येथील ए. एस. सी. महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा (मंगळवारी) पार पडला. 


        सामाजिक अंतर नियमाचे पालन करून मोखाडा येथे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगिरथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, ठेकेदार संतोष चोथे, महाविद्यालय स्थानिक समिती सदस्य कुणाल लाडे, संस्थेचे इन्स्पेक्टर संजय मोहिते, पीआरओ बाळासाहेब कारंडे, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. डॉ. यशवंत उलवेकर, उपप्राचार्य प्रा. संदनशीव, प्रा. जे. बी. वारघडे, प्रा. डॉ. संतोष जाधव, प्रा. डॉ. अमोल ममलय्या, अविनाश पाटील आदी उपस्थित होते. 


    स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता कर्मवीर अण्णांनी समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली. आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभर शिक्षणाची पंढरी निर्माण झाली, अशा महान कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे वाढविण्याच्या दृष्टिकोनातून लोकनेते रामशेठ ठाकूर स्वतः कार्यरत असून दुसऱ्यांनाही ते प्रेरीत करीत असतात. त्यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या अनेक विद्यालयांच्या इमारतींची उभारणी झाली असून त्यांचे योगदान समाजाला प्रेरणादायी ठरले. मोखाडा विभाग अतिदुर्गम आहे, असे असले तरी या भागातील विद्यार्थी आधुनिक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लक्ष केंद्रित केले. त्या अनुषंगाने या ठिकाणी महाविद्यालयीन विज्ञान विद्यार्थ्यांकरिता अडीच कोटी रुपये खर्च करून दोन मजली इमारत उभारली जाणार आहे. या इमारतीत आधुनिक लॅबोरॅटरी, ग्रंथालय, सेमिनार हॉल, लेक्चर हॉल व इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी सतत सर्वस्वी योगदान देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या इमारतीच्या उभारणीसाठी ०१ कोटी रुपयांची भरीव देणगी ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड कंपनीच्या वतीने देण्याचे जाहीर केली होती. त्यातील ५० लाख रुपयांचा धनादेशही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूमिपूजनाच्या मुहूर्तावर संस्थेचे उपाध्यक्ष भगिरथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित रयत सेवकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले.  


 


 


 


 


 


 


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...