Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने वतीने धामोळे गाव येथे २५०० वृक्षांची लागवड करण्यात आली

खारघर : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने वतीने धामोळे गाव येथे २५०० वृक्षांची लागवड करण्यात आली.  या कार्यक्रमच्या वेळी मा.आमदार तथा उत्तर रायगड भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांतजी ठाकूर, मा. कोंकण म्हाडा अध्यक्ष व महाराष्ट्र्र प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाशजी कोळी, खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेशजी पटेल,पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, अ-प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे , प्रभाकर जोशी, नगरसेवक ऍड.नरेश ठाकूर, प्रभाग 3 चे नगरसेवक हरीशजी केणी, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत,सरचिटणीस कीर्ती नवघरे, वैद्यकीय सेल संयोजक किरण पाटील , उपाध्यक्ष रमेश खडकर, उपाध्यक्ष निशा सिंग,महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार मॅडम,उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम, चिटणीस योगिता कडू,मंडल चिटणीस गुरू ठाकूर,प्रभाग ४ अध्यक्ष वासुदेव पाटील , कामगार आघाडी संयोजक गुरुनाथ म्हात्रे,संतोष शर्मा,आर के दिवाकर,विपुल चौतालिया, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, हॅपी सिंग तसेच प्रभाग 3,4 ,5,6 मधील नगरसेवक व पदाधिकारी  उपस्थित होते.     प्रसंगी SBI बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर आर.के.अगरवाल, व

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांची कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा सिडको यांच्याकडे प्रभागातील अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पाणी पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी

 खारघर मधील प्रभाग क्र. ४ मधील से 19,20,21 व 11,13 येथील बहुतांश सोसायटीमध्ये मागील एक महिन्यापासून पाणी पुरवठा हा एकतर कमी दाबाने किंवा मागणी पेक्षा कमी होतांना दिसून येत आहे. सध्य स्थितीत पावसाळा सुरू आहे व तोही मोठया प्रमाणात असतांना पाण्याचा तुटवडा कसा ?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सोसायटीतील पदाधिकारी वेळोवेळी माझ्याकडे लोकप्रतिनिधी या नात्याने आपले प्रश्न ,अडचणी मांडत असतात त्यात प्रामुख्याने माझ्या महिला भगिनींना भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी सदर बाबतीत सहाय्यक अभियंता पाणीपुरवठा विभाग ,खारघर यांना फोन केला की ते किंवा त्यांच्या कार्यालयातील प्रतिनिधी येतात व सदर सोसायटीत आल्यानंतर पाण्याचे मीटर चेक करतात अथवा पाणी पाईपलाईन तपासतात त्यावेळे पुरते पाणी व्यवस्थित येते परत ये रे माझ्या मागल्या असे होतांना दिसून येते. सोसायटपदाधिकारी यांना खालील प्रकारे आपल्या विभागाकडून सूचना दिल्या जातात १) आपल्या सोसायटीची पाईपलाईन ही फार पूर्वीची आहे किंवा तिचा व्यास छोटा आहे तो मोठा करून घ्या. २) पाणीच्या मीटर जवळ घाण अडकली आहे त्यामुळे पाणी कमी येते ३) पाईपलाईन वरती आहे खाली करू

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर

पनवेल(प्रतिनिधी) दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.          कर्जत येथील माथेरान येथे राहणारे पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनाने अकस्मात निधन झाले. सतत हसतमुख असणारे आणि लोकांच्या मदतीला धावणारे संतोष पवार यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय वर्तुळातील व्यक्तींना तसेच सामान्य नागरिकांनाही धक्का बसला.   लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.रामशेठ ठाकूर यांनी संतोष पवार यांचे चिरंजीव मल्हार पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मल्हार यांना धीर दिला. तसेच घडलेल्या घटनेची माहितीही घेतली. पत्रकार म्हणून संतोष पवार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांना सामाजिक कामात कायम सहकार्य केले. संतोष पवार यांचे सुपुत्र मल्हार पवार हे सध्या क्वारंटाईन असल्याने तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे ही आर्थिक मदत सुपुर्द करण्यात येईल. संतोष पवार यांनी काही वर्षे ‘दैनिक रामप्रहर’चे प्रतिनिधी म्हणूनह

इंजिनिअर्स विद्यार्थीचे ऑनलाईन शिक्षकदिन साजरा

खारघर : जगभरात सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. तरी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय ह्यापूर्वीच घेण्यात आला आहे. ह्या संधीचा फायदा घेत खारघरच्या सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेने 'सिव्हील इंजिनीअरिंग स्टुडन्ट्स असोसिएशन' (स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना) यांच्या विद्यमाने दि.5 सप्टेंबर रोजी 'ऑनलाईन शिक्षक दिन' साजरा केला.         सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.मंजुषा देशमुख, सिव्हील इंजिनिअरिंगच्या शाखाप्रमुख प्रा.रोशनी जाॅन व प्रा.पूजा सोमाणी व विद्यार्थी संघटनेच्या शिक्षक प्रमुख प्रा.युगंधरा कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.      शिक्षक हे विद्यार्थ्यांना पावलोपावली मार्गदर्शन करत असतात. म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संघटनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांच्या सूरांची मैफिल भरली होती. त्यांच्या मधूर गायनामुळे वातावरण मंगलमय झाले होते. त्यानंतर अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्क्रीनवर दिसणा-या ईमोजींचा वापर करून चि

सरस्वती महाविद्यालयाच्या एन्एस्एस युनिटने लॉकडाऊनमध्येही शिक्षकदिन साजरा करून जपले वेगळेपण

खारघर : दरवर्षी भारतामध्ये ५ सप्टेंबर हा सर्वत्र शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. परंतु कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतात ताळेबंदी लागू असल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. तरीदेखील नेहमीप्रमाणे खारघर मधील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने याहीवर्षी वेगळे पण जपत 'शिक्षकदिन समारंभ' साजरा केला.        संघर्षाच्या वाटेवर चालताना शिक्षक सोबती बनतात आणि अंधारात वाट दाखण्यासाठी तारा बनतात. हेच शिक्षक कोरोना महामारीच्या काळात सुद्धा वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता ज्ञानदानाचे श्रेष्ठदान करीत आहे. यासर्व बाबी लक्षात घेऊन रा.से.यो. स्वयंसेवकांनी एक चित्रफित महाविद्यालयातील शिक्षकांना समर्पित केली होती. त्या चित्रफितीत सर्व शिक्षकांच्या आठवणींना संग्रह केला होता.         त्यासहित प्रत्येक स्वयंसेवकाने आपल्या आवडत्या शिक्षकांना एक पत्र लिहून भावनांना मोकळी वाट करून दिली.त्या पत्रांचेही विविध स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.'ऑनलाईन' कार्यक्रमामध्ये या सर्व चित्रफिती आणि पत्रांचे सादरीकरण करण्यात आले. काही स्वयंसेवकांनी कविता सादर केल्या तर काही

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोखाडा महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन 

 पनवेल(प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय आणि प्रेरणादायी काम करणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पालघर जिल्हयातील मोखाडा येथील ए. एस. सी. महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा (मंगळवारी) पार पडला.          सामाजिक अंतर नियमाचे पालन करून मोखाडा येथे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगिरथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, ठेकेदार संतोष चोथे, महाविद्यालय स्थानिक समिती सदस्य कुणाल लाडे, संस्थेचे इन्स्पेक्टर संजय मोहिते, पीआरओ बाळासाहेब कारंडे, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. डॉ. यशवंत उलवेकर, उपप्राचार्य प्रा. संदनशीव, प्रा. जे. बी. वारघडे, प्रा. डॉ. संतोष जाधव, प्रा. डॉ. अमोल ममलय्या, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.      स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता कर्मवीर अण्णांनी समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली. आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभर शिक्षणाच

शिक्षणाचे माहेरघर खारघर सायबर मधे लोकसेवा फांऊडेशन ,महाविकास आघाडीचा वतीने शिक्षक दिन साजरा

    खारघर : (प्रतिनिधी) बहुजन समाजाचा प्रथम शिक्षक क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले, शिक्षिका क्रांती जोती सावित्रीबाई फुले यांनी 1847 साली देशात पुणे येथे पहिली मुलीची शाळाकाडुन 1852साली सर्व बहुजन समाजाचा मुला -मुलीना हटटर आयोग मार्फत शिक्षण सकतीचे करत शिक्षणाची दारे खुली केली या शिक्षण कार्याची सोनेरी क्षणाचीृआटवण करत पुरोगामी विचिराना प्रेरणा देत शिक्षणाचे माहेरघर खारघर सायबर सिटीमधे आगळा-वेगळा"शिक्षक दिन" साजरा लोकसेवा फांऊडेशन महाविकिसआघाडी , वतीने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी प्रभाग अधयक्ष मा श्री महेशकुमार राऊत यांचा मार्गदर्शनाखाली मा प्रदिप पाटील युवा कार्याअधयक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी खारघर विभाग मा गौतम तांबे , मा गणेश पाटील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सामाजिक विभाग यांनी प्रतिमेस हार घालुन अभिवादन करत शिक्षक दिन साजरा केला. यावेळी मा महेशकुमार राऊत सबोदित करताना -- ज्यांनी मला घडवलं ज्यांनी मला या जगात जगायला शिकवलं लढायला शिकवल अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे. असेच आपण माझ्या पाठीशी असेच उभे रहा, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती शिक्षका प्रमाणे आहे मग तो लहान असो वा मोठ

उपजिल्हा रूग्णालयात पत्रकारांसाठी पाच खाटा आरक्षित.... सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी ‘पुन्हा एकदा करून दाखविले’!

 पनवेल/प्रतिनिधी : पनवेल उपजिल्हा रूग्णालयात पत्रकारांसाठी पाच खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर कोविडबाधित होम आयसोलेशन पत्रकारांसाठी विनामुल्य सल्ला आणि मार्गदर्शन तसेच औषधांबाबत सहकार्य करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दोन्ही निर्णयांमुळे पनवेलच्या पत्रकारांना मोठा आधार मिळाला आहे. आतापर्यंत पत्रकारांसह सहा जणांच्या कुटुंबांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आलाच आहे. शिवाय पुण्यातील पांडूरंग रायकर नावाच्या पत्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील सर्वच पत्रकारांच्या आरोग्याचा  प्रश्‍न अधोरेखित झाला आहे. त्यावर पनवेलसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू यांच्या मागणीनंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  रायकर यांच्या मृत्यूनंतर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कांतीलाल कडू यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी त्वरीत पत्रव्यवहार करून पत्रकारांकरीता कोविडसाठी आरक्षित खाटांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर पनवेल उपजिल्हा रूग्णालयात डॉ. नागनाथ येमपल्ले यांच्याशी कडू यांनी चर्चा केल्

पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य" या महाराष्ट्रातील पैलवानांच्या अग्रणी संस्थेच्या कार्यकारिणीवर पै.अतुल भाऊ जगताप व आप्पासाहेब मगर यांची नियुक्ती जाहिर

      देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे पहिलवानांचे आगर मानले जाते.देशाच्या कुस्ती पटलावरती महाराष्ट्रातील अनेक मातब्बर पैलवानांनी राज्याचे आणि स्वतःचे नांव कोरले आहे.१९५२ च्या फिनलंडमध्ये भरलेल्या हेलसिंकी आॕलिंपिकमध्ये पैलवान खाशाबा जाधव यांनी कुस्तीमधील पहिले आॕलिंपिक पदक मीळवून जगात देशाचा दबदबा निर्माण केला होता त्याचबरोबर महाराष्ट्राची मान सन्मानाने ताठ झाली होती.असा हा महाराष्ट्र कुस्तीमध्ये आजही पुढेच आहे.        कोल्हापूर,सातारा,सांगली तसेच रायगडमध्ये आजही अनेक मल्ल मातीशी दोन हात करीत आहेत.त्यांच्या गरजा आणि समस्या वेगवेगळ्या आहेत.त्या सोडविण्यासाठी अनेक संस्था,संघटना तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद कार्यरत आहेत.त्यामध्ये,"पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य" ही संघटना पैलवानांसाठी अहोरात्र मेहनत करीत आहे.नुकतीच या संस्थेच्या कार्यकारिणीवर नविन नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या.      पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पै.मारूती भाऊ जाधव व पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख पै.अजित दादा जाधव व पैलवान ग्रुप रायगड जिल्हा अध्यक्ष पै.रूपेश भाऊ पावशे आणि पैलवान ग्र

आईने स्वत:च्या मुलीचाच वेश्यागमनासाठी सौदा केला

(पिडीत मुलीची आई संशयित आरोपी सोनम हाकिम सिंग)      नवी मुंबई : मा. पोलीस आयुक्त, नवी मुंबई श्री. संजयकुमार यांनी नवी मुंबई हद्दीतील आढळणाऱ्या बेकायदेशीर अवैध कृत्यांना आळा घालण्याबाबत गुन्हे शाखेस सुचना दिलेल्या आहेत.       मा. पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या सुचनांचे अनुशंगाने पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. प्रवीणकुमार पाटील, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा श्री. विनोद चव्हाण यांचे मार्गदर्षनाखाली काम करीत असताना दि. 28/08/2020 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन गरड यांना माहिती मिळाली की, मीरा-भाईंदर येथे राहणारी एका महिलेस सुमारे अठरा वर्षे वयाची तरुण मुलगी आहे, स्वतःच्या मुलीचा यापूर्वी कोणत्याही पुरुषाबरोबर शरीर संबंध झालेला नाही, यासाठी प्रथम संभोग करू इच्छिणा-या ग्राहकाच्या शोधात असल्याबाबत खबरी मार्फत माहिती मिळाली.       सदरची माहिती खबरी मार्फत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांना मिळाल्यानंतर, बनावट ग्राहका मार्फत सदर महिलेबरोबर बोलणे केले असता, तिने प्रथम तिच्याच मुलीच्या प्रथम शरीर संभोगासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. आप