देशभक्तीचे अनोखे दर्शन
खारघर :जगभरात धुमाकुळ घातलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीचे सावट असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळा-महाविद्यालये अद्याप तरी सुरु करण्याचा निर्णय घेतला नाही. ह्याच पार्श्वभूमीवर खारघरच्या सरस्वती काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगने १५ ऑगस्ट 'डिजीटल स्वातंत्र्यदिन दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतला तर ह्या परिस्थितीचा लाभ घेत महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटने 'डिजीटल जनजागृतीपर नाट्य' सादर करत सेवा देण्याची सुवर्णसंधी सोडली नाही.
सदर उपक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.मंजुषा देशमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.सुनीता पाल यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात पार पडला.
विद्यार्थ्यानी सादर केलेल्या डिजीटल नाट्यात तीन कळीच्या मुद्यावर बोट ठेवले गेले. 'महामारीच्या महाभयंकर काळात प्रत्येक परिस्थितीत स्वतःला मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त कसे ठेवता येईल' हा नाटकाचा विषय होता. तीन दृश्यांवर हे नाटक आधारलेले होते.
प्रथम दृश्यात पोलिस व कोरोना योद्धयांना व त्यांच्या कुटुंबियांना करावा लागणारा संकटांचा सामन्यांचे सादरीकरण केले. दुस-या दृश्यात कोरोना योद्धे कुटुंबापासून कसे दूर आहेत ह्याचे भावनिक दर्शन घडले तर शेवटच्या दृश्यात ऑनलाईन शिक्षण घेताना मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थांना सोसाव्या लागणा-या अडचणी तसेच नोकरवर्गाच्या गेलेल्या नोक-यांसारख्या गंभीर मुद्द्यावर भाष्य करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी सरकारच्या निर्बंधाचे पालन करत घरीच सुरक्षित राहून नाटकाचे सादरीकरण तयार केले व सादर केले. बदललेल्या परिस्थितीत जनजागृतीपर उपक्रम सादर करत अनोख्या देशसेवेचे दर्शन घडले. ह्या डिजीटल नाट्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment