Skip to main content

मुंबई विद्यापीठ, विधी शाखा आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयातर्फे पाच दिवसांचा वेबीनार


पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठाच्या विधी विभाग आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम २०२० – २१ अंतर्गत; ‘लॉं अ‍ॅट युवर डोअर स्टेप’ या २८/७/२०२० ते १/७/२०२० अशा सलग पाच दिवसांच्या वेबीनरचे आयोजन मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्‍हाडी आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांच्या पुढाकाराने आयोजित केले होते. या वेबीनारचे आयोजन भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या ‘झुम मिटींग’ या अकाऊंटवरुन करण्यात आले होते.


    दिनांक २८/७/२०२० रोजी या वेबीनारचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्‍हाडी यांनी दुपारी २:३० वाजता केले. त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी केले आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या, विधी शाखेतील सहा. प्राध्यापक डॉ. श्री. संजय जाधव यांनी ‘आर्बिट्रेशन आणि मेडीएशन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


    दिनांक २९/७/२०२० रोजी जितेंद्र चव्हाण विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. शर्मिला घुगे यांचे ‘आर्टीकल - २१ कॉन्स्टीट्यूशन ऑफ इंडीया – ग्लिम्प्स अॅट लँडमार्क जजमेंट्स’ या विषयावर, दिनांक ३०/७/२०२० रोजी अॅड. श्रीकांत गावंड, अति. सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय यांचे ‘कन्फेशन ऑफ अॅक्युज्ड इन क्रिमिनल लॉ’ या विषयावर, दिनांक ३१/७/२०२० रोजी अॅड. सौ. विरा गायकवाड, अति. सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय यांचे ‘ड्राफ्टींग ऑफ प्लिडींग अँड कॉन्व्हेयन्स’ या विषयावर तर शेवटी दिनांक १/८/२०२० रोजी अॅड. निरंजन मुंदरगी, वकील, मुंबई उच्च न्यायालय यांनी ‘रिलेव्हन्सी ऑफ फॅक्टस’ या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. या प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी प्रत्येक व्यक्त्याने प्रश्न-उत्तरे सदरात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.       


     ‘लॉं अ‍ॅट युवर डोअर स्टेप’ या मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाने सुरू केलेल्या उपक्रमासाठी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाची सर्वात प्रथम निवड केल्याबद्दल प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी डॉ. राजेश्री वर्‍हाडी यांचे तसेच वेबीनार मध्ये मार्गदर्शन करणारे सर्व व्याख्याते आणि सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. रामशेठ ठाकूर साहेब आणि व्हाईस चेअरमन श्री. वाय. टी. देशमुख साहेब आणि सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांचे विशेष आभार मानले. त्यानंतर मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्‍हाडी यांनी या पाच दिवसांच्या वेबीनारच्या समारोपाचे भाषण देताना भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाचे वेबीनारच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी होणार्‍या विविध कार्यक्रमांत भाग घेण्याचा सल्ला दिला.


    पाच दिवस चाललेल्या या वेबीनार मध्ये भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतच इतर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुध्दा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहा. प्रा. कु. श्रुती पोटे, प्रा. आष्का शुक्ला तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुयश बारटक्के कु. अक्षता ठाकूर, कु. संचिता करडक, कु. संचिता चिमणे आणि फैजान शेख यांनी संयोजनाची जवाबदारी पार पाडली. या वेबीनार मालिकेतील प्रत्येक दिवशी कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने तर सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. या वेबीनार मध्ये सहभागी होणाऱ्यास, प्रत्येक दिवशीच्या उपस्थितीबाबत सहभागाचे प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने देण्यात आले.


 


 


 


 


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.