पनवेल महापालिका क्षेत्रात सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली राहणार शिवसेनेचे गुरूनाथ पाटील यांच्या मागणीला यश
पनवेल(प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने शनिवारी स्वातंत्र्य दिनापासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी शिवसेनेचे पनवेल महानगर उपसंघटक गुरूनाथ पाटील यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे.
पनवेल महानगरपालिकेने मिशन बिगीन अगेन नुसार हद्दीतील दुकानांना सम विषम तारखेला परवानगी देण्यात आली होती. दिवसाआड पद्धतीमुळे व्यवसाय होत नसल्याने व्यापारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे नियमित व्यवसाय करण्यास मुभा देण्याची लेखी मागणी गुरूनाथ पाटील यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून शनिवारी स्वातंत्र्य दिना पासून सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि तसे आदेश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहेत.
Comments
Post a Comment