भाविकांचा होम क्वारंटाईन कालावधी कमीत-कमी करावा - आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
पनवेल(प्रतिनिधी) : पर राज्यातून व पर जिल्हयातून विशेषतः दिड आणि पाच दिवसाच्या गणपतीसाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांचा होम क्वारंटाईन कालावधी कमीत-कमी करावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. स
शासन आदेशानुसार कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना १० दिवसांचे होम क्वारंटाईन करण्याचे आदेश काढण्यात आले असले तरी दिड व पाच दिवसांचे गणपती असलेल्या भाविकांना त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे कमीत कमी होम क्वारंटाईन कालावधी करावा, असे या निवेदनातून अधोरेखित केले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले कि, दि. २९/०७/२०२० रोजीच्या परीपत्रकातील आदेशात क.१६ नुसार आपण गणपती उत्सवासाटी पर राज्यातून, पर जिल्हयातून येणाऱ्या भाविकांना रायगड जिल्हयात १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचे नमुद केले आहे . त्यामुळे या आदेशामुळे पर राज्यातून व पर जिल्हयातून येणाऱ्या दिड दिवसाच्या व पाच दिवसाच्या भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. विशेषतः चाकरमानी व छोटे मोठे उद्योगधंदे करणाऱ्या व्यावसायिकांना दीड दिवसाच्या गणपतीसाठी आल्यामुळे १४ दिवस होम क्वारंटाईन केल्यास चाकरमान्यांना आपल्या नोकरीवर व छोटे-मोटे उद्योग धंदा करणाऱ्या व्यावसायिकांवर त्याचा परिणाम होणार आहे. विशेषतः दिड दिवसाच्या गणपती साठी रायगड जिल्ह्यात येणाच्या भाविकांना १४ दिवस होम क्वारंटाईनचा कालावधी कमी करण्यासाठी त्यांची जागेवरच आरोग्य तपासणी केल्यास भाविकांना होणारी अडचण दुर होण्यास मदत होईल. या वस्तुस्थितीचा गांभिर्याने विचार करता आपल्या परिपत्रकातील आदेश क्रमांक १६ मध्ये नमुद केलेल्या पर राज्यातून, पर जिल्हयातून विशेषतः दिड दिवसाच्या गणपती साठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांची आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाईन क रण्याचा कालावधी कमीत-कमी व्हावेत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या नमूद केले आहे.
Comments
Post a Comment