Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

खारघर स्मशानभूमीतील समस्या लवकरात लवकर दूर कराव्यात अशी मागणी गुरुनाथ पाटील यांनी सिडको प्रशासनाला केली

खारघर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना,कोरोना महामारीत अनेकांचा दुर्दैवी मृत्यूही होत आहे.अश्यात खारघरमधील स्मशानभूमीत ज्या मृतदेहांना दहन करण्यासाठी आणण्यात येते,त्या मृतदेहांची अंतिमविधी करताना अनेक अडचणी रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांना व मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना येत आहेत.     पावसाळ्यामुळे स्मशानभूमीतील पत्रे गळू लागले आहेत. याचबरोबर मृतदेह दहन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या सर्वांवर लवकरात लवकर तोडगा निघावा व स्मशानभूमीची झालेल्या दुरावस्था लवकरात लवकर सुरळीत व्हाव्यात यासाठी शिवसेना उपमहानगर संघटक पनवेल श्री.गुरुनाथ लिलाधर पाटील यांनी प्रशासनाला मागणी केली आहे.

सीझेडएमपी १९९१ व सीझेडएमपी २०११ मधील तरतुदीस अनुसरून मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे मागणी 

पनवेल(प्रतिनिधी) : सिडको प्राधिकरणाकडून सीझेडएमपी १९९१ व सीझेडएमपी २०११ मधील तरतुदीस अनुसरून मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.      आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सिडको प्राधिकरणाकडून १२.५ टक्के योजने अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडावर, नियोजन प्राधिकरण म्हणून खाजगी व्यक्ती. खाजगी संस्था व सहकारी गृहनिर्माण संस्थांना बांधकाम परवानगी प्रदान करते. तथापी, सिडकोकडून सदर भूखंड विकसित झाल्यावर भोगवटा प्रमाणपत्र अदा करते वेळी, भूखंड किनारवर्ती क्षेत्र व्यवस्थापन योजना (सीझेडएमपी २०११) तील तरतुदीमुळे बाधित होत असल्याचे कारणास्तव प्रलंवित ठेवते तसेच भूखंड सीझेडएमपी १९९१ मधील तरतुदीमुळे वाधित होत असल्यास महाराष्ट्र किनारवर्ती क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए ) कडे मान्यतेसाठी पाठविले जाते. अशा प्रलंबित प्रकल्पांची संख्या मोठया प्रमाणावर आहे.       याबावत आपल्या निदर्शनास आणून देण्यात येते की, नवी मुंबई

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप

पनवेल(प्रतिनिधी) गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल ६० हजार कुटुंबांना गणेशोत्सव गोड करण्यासाठी अन्नधान्य दिले जात आहे. या अंतर्गत पनवेल शहरातील लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.           कोरोना काळात लॉकडाऊन लागू झाल्यापासून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजच्या वतीने नागरिकांची विविध प्रकारे सेवा करून सर्वतोपरी मदत सुरू झाली. मदतीचा हा ओघ आजतागायत चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवात ग्रामीण व शहरातील ६० हजार कुटुंबांना साखर, मैदा, तूप, गूळ, चणाडाळ व रवा या धान्याचे एकत्रित पॅकेट देऊन गणेशोत्सव गोड केला जात आहे. त्यानुसार पनवेलच्या लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वाटपावेळी नगरसेविका रूचिता लोंढे, चंद्रकां

सरस्वती काॅलेजच्या एनएसएस युनिट मार्फत `डिजीटल जनजागृतीपर नाटक' सादर केले

देशभक्तीचे अनोखे दर्शन  खारघर :जगभरात धुमाकुळ घातलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीचे सावट असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळा-महाविद्यालये अद्याप तरी सुरु करण्याचा निर्णय घेतला नाही. ह्याच पार्श्वभूमीवर खारघरच्या सरस्वती काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगने १५ ऑगस्ट 'डिजीटल स्वातंत्र्यदिन दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतला तर ह्या परिस्थितीचा लाभ घेत महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटने 'डिजीटल जनजागृतीपर नाट्य' सादर करत सेवा देण्याची सुवर्णसंधी सोडली नाही.     सदर उपक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.मंजुषा देशमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.सुनीता पाल यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात पार पडला.      विद्यार्थ्यानी सादर केलेल्या डिजीटल नाट्यात तीन कळीच्या मुद्यावर बोट ठेवले गेले. 'महामारीच्या महाभयंकर काळात प्रत्येक परिस्थितीत स्वतःला मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त कसे ठेवता येईल' हा नाटकाचा विषय होता. तीन दृश्यांवर हे नाटक आधारलेले होते.    प्रथम दृश्यात पोलिस व कोरोना योद्धयांना व त्यांच्या कुटुंबियांना करावा लागणारा संकटांचा सामन्यांचे सादरीकरण केले. दुस-या दृ

खारघर सायबर सिटीमधे पर्यायरणाचे समतोलतेच संदेशदेत 74 वा भारतीय स्वातंत्र्य साजरा

खारघर ( प्रतिनिधि ) : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सालाबाद लोकसेवा फाऊडेशन , नागरी हक्क समिती व महाविकाश आघाडी वतीने खारघर सायबर सिटी मधे शहराची शान ,ओळख उत्सव चौक, , येथे राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण आयोजित करण्यात आले होते. गेले १o वर्ष सातत्याने येथे ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात येत आहे      पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक विभागाचे अध्यक्ष तथा लोकसेवा फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष श्री.भाऊसाहेब लंबडे यांच्या हस्ते खारघर येथील राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत व संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन करण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख पावणे मा अतुल गुजर SPORTS MAN अॅड जे पी खारगे अॅड संतोष खोपडे होते यावेळी मा अतुल गुजर SPORTS MAN यांनी सायकलिंक करत चित्रकलेतुन झाडे लावा झाडे जगवा, करोनाचा पार्शवभुमिवर घरी राह सुरक्षित राहा,रसते ट्राफिक प्रदुशण वर इंधन वाचवा सायकलिंकाचा वापर कराअसे पर्यावरणपुरक समतोलतेचे संदेश देऊन संपुर्ण खारघर शहरात सायकलिक करत भ्रमण केले व तसेच सामाजिक श्रेतात काम करताना यांना व यांंचा दोनी मुली ऐश्वर्या व सृष्टि sports-person

दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कडुन गणेशोत्सवात तब्बल ६० हजार कुटुंबांना धान्य वाटप

पनवेल(प्रतिनिधी) : गोरगरिबांच्या सुख दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल ६० हजार कुटुंबांना गणपती सण गोड करण्यासाठी अन्नधान्य दिला जाणार आहे.         संपूर्ण जग 'कोविड १९' या आजाराशी लढा देत आहे. भारतामध्ये सुद्धा या विषाणूच्या प्रादुर्भावाने हजारो लोक मृत्यूमुखी पडले. कोरोना विषाणू प्रादुर्भाव महामारी आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे जगभरात अर्थव्यवस्था बिकट झाली. या परिस्थितीत गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने 'मोदी भोजन' कम्युनिटी कम्युनिटी किचनच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या १ ल

पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी सेंटर सुरू करण्यासाठी निवेदन : गुरूनाथ पाटील

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी सेंटर सुरू करण्यासाठी मागणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे शिवसेना पनवेल तालुका उपमहानगर संघटक गुरूनाथ पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका हद्दीत सध्य स्थितीला मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा प्रदूर्भाव वाढला आहे. त्यामुळे आज घडीला मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढत चालली आहे. यात दिलासादायक बाब हिच आहे की, रूग्ण बरे होण्याची संख्यासुद्धा वाढत चालली आहे. त्यामुळे उर्वरीत रूग्णांसाठी पनवेल महानगरपालिकेने प्लाझ्मा थेरेपी सेंटर लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. याचा फायदा रूग्णांना होऊन पनवेल लवकरच कोरोना मुक्त होईल तरी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून प्लाझ्मा सेंटर सुरू करावे अशी मागणी शिवसेना पनवेल तालुका उपमहानगर संघटक गुरूनाथ पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.      

उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा 'कोविड योद्धा' सन्मानपत्र देऊन गौरव

पनवेल(प्रतिनिधी) कोरोना विषाणू जागतिक महामारीत नागरिकांना आवश्यक ती सर्वोतपरी मदत करत आधार देणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा पनवेल उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमिताने 'कोविड योद्धा' सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.      कोरोना व्हायरस आणि त्यामुळे आलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सचिव परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेलच्यावतीने 'मोदी भोजन' कम्युनिटी किचन अर्थात मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले त्यामार्फत हातावर पोट असलेल्या १ लाख २५ हजारहून नागरिकांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर ९० हजारहून अधिक नागरिकांना कोरडा अन्नधान्य देऊन कोरोनाच्या संकटकाळात आधार देण्यात आलेला. तसेच १ लाखाहून अधिक नागरिकांना मास्क व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या, सॅनिटायझर अशा अनेक आवश्यक साहित्य देण्यात

   पार्थ दादा पवार फाउंडेशन यांच्या मार्फत खारघर शहरामध्ये सैनेटायजरचे वाटप : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहर

खारघर : देश आणि महाराष्ट्र राज्य आजही कोरोना या साथीच्या रोगाचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक हित लक्षात घेऊन पार्थ दादा पवार यांच्या फाउंडेशन मार्फत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री प्रशांतभाऊ पाटील,युवक प्रदेश अध्यक्ष श्री मेहबूब शेख यांच्या मार्गदशंनाखाली पनवेल महानगरपालिका नगरसेवक श्री विजय खाणावकर,पनवेल शहर जि.उपाध्यक्ष प्राचार्य बी.ए.पाटील व पनवेल शहर जि.सहसचिव श्री बबनराव पवार यांच्या सहकार्याने दिनांक १६/८/२०२० रोजी खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके आणि महिला अध्यक्ष सौ राजश्री कदम यांच्या नेतृत्वाखाली खारघर शहरामधील विविध सोसायटी आणि अतिआवश्यक सेवेत आपली कामगिरी निभावणार्या घटकापर्यन्त सैनेटायजर वाटपाचे काम केले.    सर्वप्रथम सेक्टर ३५ येथील स्वनपूर्ती सोसायटीमध्ये वाटपकरत असताना सर्वसामान्य लोकांनी पार्थ दादा यायचे कौतुक  केले.या प्रसंगी तेथील रहिवासी श्री संतोष व्हावळ आणि मुकेश शिंदे यांनी पार्थ दादा याचे आभार मानले.त्याच बरोबर सेक्टर १६ येथील वास्तुविहार KH २ सहकारी संस्था,KH २ पारिजात सहकारी,KH ३ संस्कृर्ती सोसायटी ,KH ३ उत्सव सोसायटी ,KH ४ सेलेब्रिशन,वास्तुविहार KH

पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने सम आणि विषम खुले करण्याच्या मागणीला आमदार प्रशांत ठाकूर यांना यश

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने शनिवारी स्वातंत्र्य दिनापासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे.       पनवेल महानगरपालिकेने मिशन बिगीन अगेन नुसार हद्दीतील दुकानांना सम विषम तारखेला परवानगी देण्यात आली होती. दिवसाआड पद्धतीमुळे व्यवसाय होत नसल्याने व्यापारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे नियमित व्यवसाय करण्यास मुभा देण्याची लेखी मागणी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्याचबरोबर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. तसेच समन्वय बैठकीत या मुद्द्यावर जोर देऊन पाठपुरावा केला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला आणि सातत्यपुर्ण पाठपुराव्याला यश आले असून शनिवारी स्वातंत्र्य दिना पासून सर्व दुकान सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि तसे आदेश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहेत.          आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले होते कि, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाप

पनवेल महापालिका क्षेत्रात सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली राहणार शिवसेनेचे गुरूनाथ पाटील यांच्या मागणीला यश

पनवेल(प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने शनिवारी स्वातंत्र्य दिनापासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी शिवसेनेचे पनवेल महानगर उपसंघटक गुरूनाथ पाटील यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे.      पनवेल महानगरपालिकेने मिशन बिगीन अगेन नुसार हद्दीतील दुकानांना सम विषम तारखेला परवानगी देण्यात आली होती. दिवसाआड पद्धतीमुळे व्यवसाय होत नसल्याने व्यापारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे नियमित व्यवसाय करण्यास मुभा देण्याची लेखी मागणी गुरूनाथ पाटील यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून शनिवारी स्वातंत्र्य दिना पासून सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि तसे आदेश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहेत.    

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ - सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती मुबई, दि. १३: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून मिळणार सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. या संदर्भात मंत्री श्री. शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.    टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरीकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.     स

राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलतर्फे आदिवासी व गरीबवस्तीतील बालगोपाळांसोबत स्नेहभोजन करून दहीहंडी साजरी

पनवेल / प्रतिनिधी : छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल - रायगड यांच्यावतीने समाजसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रिदवाक्याप्रमाणे श्रीमंत छत्रपती मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून दिनांक १२ ऑगस्ट २०२० रोजी गोकुळाष्टमी व दहीहंडीच्या निमित्ताने गरीब वस्तीतील व आदिवासी वाडीतील बाळगोपाळांसोबत स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील रिटघर गावातील आदिवासी वाडीवरील बालगोपालांसोबत दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले, डेरवली विभाग अध्यक्ष किरण पालये, खांदा कॉलनी उपाध्यक्ष सदाशिव मोरे, ओमकार महाडिक, अमित पंडित, गौरव भेंडे, रोहन सिनारे, सचिन गणेचारी, तेजस काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या चित्र कला व नृत्य स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार

स्पार्धेतील विद्यार्थ्यां सोबत पनवेल महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील,नगरसेवक रामजी बेरा व इतर मान्यवर खारघर, : भारतीय जनता पार्टी आणि प्रवीण स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन चित्रकला आणि नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्र कला स्पर्धेत विद्यार्थांनी माझा आवडता नेता किवा करोना योध्दा यांचे चित्र तर नृत्य स्पर्धेसाठी देश भक्तिपर अथवा लोक संगीतावर आधारित नृत्य हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत,पनवेल विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते.चित्रकला स्पर्धेत प्रथम लक्ष्मण भोईर , जसमीन राजगुरू, तनिषा भोईर,श्री आनंद भोईर,श्रेया पाल तर नृत्य स्पर्धेत कार्तिकी गवारी,तनुश्री साबणे,प्रार्थना पटेल,आर्या सोनटक्के आणि अस्मि गायकवाड आदी विजेते ठरले स्पर्धेतील दोन्ही गटात दहा विजेत्यांना पनवेल महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील,नगरसेवक रामजी बेरा यांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र देवून सन्मान करण्यात आले.या वेळी भाजप युवा मंडलचे अध्य

ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या काळात विद्यार्थ्यांकडून इतर शुल्क न मागण्याच्या विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश

पनवेल : पनवेल विभागातील काही शाळांकडून पालकांना शाळा प्रशासनाने शिक्षण शुल्क, वाहतूक आणि इतर शुल्क भरण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांकडून इतर शुल्क मागू नये अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी गट शिक्षण अधिकारी पनवेल यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून त्यानुसार गटशिक्षण अधिकारी पनवेल यांच्याकडून शाळांना पालकांकड़े फी भरण्याची सक्ती करू नये अशा प्रकारचे आदेश निघाले आहेत.          राज्यात ठिकठिकाणी ऑनलाइन शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे पालकांकडून शाळा शुल्क वसूल करत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही शाळा इतर शुल्क देखील मागत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. याला नागरिक त्रासले होते. काही दिवसांपासून दिल्ली पब्लिक स्कूल (DPS), पनवेल येथील शाळेने पालकांकड़े मागे फी भरण्याचा तगादा लावला. या लॉकडाऊन काळामध्ये या शाळेने फी संदर्भात काही स्पष्ट धोरण सांगावे अशी पालकांची मागणी असतानासुद्धा कोणतेही स्पष्टीकरण पालकांना दिले नाही. त्यामुळे याची माहिती 400 हून पालकांनी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम

भाविकांचा होम क्वारंटाईन कालावधी कमीत-कमी करावा - आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी 

पनवेल(प्रतिनिधी) : पर राज्यातून व पर जिल्हयातून विशेषतः दिड आणि पाच दिवसाच्या गणपतीसाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांचा होम क्वारंटाईन कालावधी कमीत-कमी करावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. स    शासन आदेशानुसार कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना १० दिवसांचे होम क्वारंटाईन करण्याचे आदेश काढण्यात आले असले तरी दिड व पाच दिवसांचे गणपती असलेल्या भाविकांना त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे कमीत कमी होम क्वारंटाईन कालावधी करावा, असे या निवेदनातून अधोरेखित केले आहे.      आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले कि, दि. २९/०७/२०२० रोजीच्या परीपत्रकातील आदेशात क.१६ नुसार आपण गणपती उत्सवासाटी पर राज्यातून, पर जिल्हयातून येणाऱ्या भाविकांना रायगड जिल्हयात १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचे नमुद केले आहे . त्यामुळे या आदेशामुळे पर राज्यातून व पर जिल्हयातून येणाऱ्या दिड दिवसाच्या व पाच दिवसाच्या भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. विशेषतः चाकरमानी व छोटे मोठे उद्योगधंदे करणाऱ्य

मुंबई विद्यापीठ, विधी शाखा आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयातर्फे पाच दिवसांचा वेबीनार

पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठाच्या विधी विभाग आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम २०२० – २१ अंतर्गत; ‘लॉं अ‍ॅट युवर डोअर स्टेप’ या २८/७/२०२० ते १/७/२०२० अशा सलग पाच दिवसांच्या वेबीनरचे आयोजन मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्‍हाडी आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांच्या पुढाकाराने आयोजित केले होते. या वेबीनारचे आयोजन भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या ‘झुम मिटींग’ या अकाऊंटवरुन करण्यात आले होते.     दिनांक २८/७/२०२० रोजी या वेबीनारचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्‍हाडी यांनी दुपारी २:३० वाजता केले. त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी केले आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या, विधी शाखेतील सहा. प्राध्यापक डॉ. श्री. संजय जाधव यांन

छोटया मोठया व्यापाऱ्यांना दैनंदिन व्यवसायासाठी परवानगी द्या - आमदार प्रशांत ठाकूर

              पनवेल :पनवेल महानगरपालिका हद्दीतील छोटयामोठया व्यापाऱ्यांना दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका हद्दीत सुरुवातीच्या काळात केंद्र शासनाने जाहिर केलेला व महाराष्ट्र शासनाने वाढवलेला असा लॉकडाऊन हा २४ मार्च ते ३१ मे पर्यंत सुरु राहिला. काही प्रमाणात मे महिन्यात व नंतर जून महिन्यात उद्योग, व्यवसाय व व्यापार यांची गाडी स्थळावर येते ना येते तोच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या नावाखाली महापालिकेमार्फत ३ जुलै पासून पुन्हा लॉकडाऊन जाहिर झाला. लॉकडाऊनमध्ये दुकाने पूर्णपणे बंद असल्यामुळे उद्योजकांना व्यापाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.            सध्यस्थितीत १ ऑगस्टपासून लॉकडाऊनचे नियम जाहिर करताना दररोज सम-विषम तारखेप्रमाणे छोटया-मोठया व्यापाऱ्यांची दुकाने सुरू ठेवलेली आहेत . परंतू पनवेल मधील डी-मार्ट तसेच सुपर /मिनी मार्केट मधील व्यवहार लॉकडाऊनमध

प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांची शिवशंभू ट्रस्ट नवी मुंबई संपर्क प्रमुख पदी निवड

पनवेल: शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवशंभू ब्लड फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी नवी मुंबई शहर संपर्क प्रमुख पदी शिक्षण, समाजकारण, रक्तदान चळवळीत सक्रीय कार्यरत असणारे प्राध्यापक श्री हेमंत जालिंदर धायगुडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.       समाजातील गोरगरीब कष्टकरी , दीन-दुबळ्या, वंचित, शेतकरी वर्गासाठी,गरजू रक्तदात्यांसाठी शिवशंभू ब्लड फौंडेशन व हेमंतराजे धायगुडे पाटील ब्लड फौंडेशन वेळोवेळी मदत पोहचवण्यासाठी कार्यरत आहे.       रक्तदान चळवळीत काम करणारी संस्था म्हणजे शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवशंभू ब्लड फौंडेशन महाराष्ट्र राज्य या ट्रस्टचे मार्गदर्शक आधारस्तंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषणदादा सुर्वे व संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री आप्पा घोरपडे,परभणी जिल्हा संपर्क प्रमुख उज्ज्वलाताई पाटील, कल्याण तालुका संपर्क प्रमुख शुंभागीताई धायगुडे पाटील तसेच सर्व कमिटी सदस्य हे महाराष्ट्रातील रक्तदात्यांना नेहमी मोफत रक्त मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. "रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान" ही सं

सहकारी भगिनी व बंधूंनो.. सप्रेम नमस्कार!

पनवेल(प्रतिनिधी) ०५ ऑगस्ट रोजी माझा जन्मदिन. या जन्मदिनी आपण आवर्जून प्रत्यक्ष भेटून अथवा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून शुभेच्छा देत असता. आपल्या या शुभेच्छा मलाही सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा देत आल्या आहेत.सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात एकत्र येण्यावर व सामाजिक कार्यावर बंधने आली आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपण सहभागी होत असलेले आरोग्य महाशिबिर या वर्षी याच बंधनांमुळे आयोजित करता आले नाही, शिवाय अनेक सहकारी सहृदयांच्या परिवारात कोरोनाच्या आघातामुळे दु:खाची छाया आहे. अशा स्थितीत वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. म्हणूनच आपणास नम्र विनंती आहे की, वाढदिवसाच्या दिवशी भेटण्याचा आग्रह धरू नये. जाहिराती अथवा बॅनर्सपेक्षा नेहमीप्रमाणे सामाजिक कार्य करून आपल्या शुभेच्छा द्या. मला त्या नक्की पोहोचतील. जन्मदिन एक दिवसाचा. तुमच्या शुभेच्छा मला सातत्याने मिळाल्या आहेत. तुमचे शुभाशीर्वाद व सहकार्यामुळेच आजवरची वाटचाल संपन्न झाली. हे शुभाशीर्वाद आणि सहकार्य कायम राहू द्या. आपला स्नेहाभिलाषी, आमदार प्रशांत ठाकूर (अध्यक्ष, भाजप उत्तर रायगड जिल्हा)          

रिक्षाचालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारविरोधात पनवेलमधील रिक्षाचालकांचे मुंडन

पनवेल / प्रतिनिधी : लॉकडाऊनसारख्या कठीण काळात सरकार रिक्षाचालकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले नाही व त्यांना आर्थिक मदत देखील केली नाही. याउलट सक्तीने दंडात्मक कारवाई करून त्यांना रिक्षा बंद करण्यास भाग पाडल्याने रिक्षाचालकांवर अन्याय झाला असून यामुळे रिक्षाचालक संतापला आहे. रायगड जिल्हा व नवी मुंबई शहराला लागून असलेल्या उरण तालुक्यामध्ये रिक्षांची संख्या सुमारे सहा हजारांहून जास्त आहे. अनेक उच्च शिक्षित, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासकीय किंवा खाजगी कंपनीत काम न मिळाल्याने स्थानिक बेरोजगार तरुण रिक्षा व्यवसायात उतरले आहेत. निदान रिक्षा चालवुन तरी आपल्यासह आपल्या कुटुंबांचा चरितार्थ चालविता येईल, या आशेने नाईलाजाने स्थानिक तरुण रिक्षा व्यवसायाला लागले आहेत. मात्र २२ मार्चपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात रिक्षा चालकांना प्रवासी वाहतूकीस परवानगी नसल्याने त्यांना विविधसंकटाना सामोरे जावे लागत आहे. मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च, रिक्षा घेतलेल्या बँकेचे कर्ज, त्याचे हप्ते, कुटुंबियांच्या पालन पोषणाचा खर्च, आरोग्याचा प्रश्न निर्मा