पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत निर्जंतुकीकरण व मच्छर धूर फवारणी करण्याची मागणी शिवसेना उपमहानगर संघटक गुरुनाथ पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
या निवेदनात गुरूनाथ पाटील यांनी नमुद केले आहे की, पावसाळा सुरू होऊन जवळ जवळ २० ते २५ दिवस उलटून गेले आहेत व तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निम्म्याहून लोक घाबरून आजार लपवत आहेत.हे आजार काही वेगळे नसून दरवर्षी पावसाच्या साचलेल्या पाण्यातून निर्माण झालेल्या मच्छरांनमुळे उध्दभवलेले साथीचे आजार आहेत, महानगरपालिका दरवर्षी निर्जंतुकीकरण फवारणी करत असते या वेळेस कोरोनाच संकट असल्यामुळे फवारणीसाठी विलंब होत असल्याने सरळ सरळ नागरिकांच्या जिवाशी खेळ चालू आहे असे निदर्शनास येत आहे. म्हणून नागरी प्रश्नावर लक्ष वेधून पनवेल महानगरपालिका हद्दीत निर्जंतुकीकरण फवारणी व मच्छर धूर फवारणी लवकरात लवकर करून घ्यावी अशी मागणी गुरूनाथ पाटील यांनी केली
Comments
Post a Comment