लिंब : सातारा जिल्ह्यात कलिंगड , खरबूज, पपई आणि डाळिंब ह्या फळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. पंरतु शेतकऱ्यांना या मालाला दर्जाप्रमाणे योग्य दर मिळत नव्हता. लिंब गावाचे युवा व्यापारी शुभम सोनमळे यांच्या प्रयत्नातून कलिंगड , खरबूज , पपई आणि डाळिंब उत्पादकाना योग्य भावासाठी वाशी एपीएमसी फळ मार्केटमध्ये हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. तसेेच आता शेतकऱ्यांच्या मालाला दर्जाप्रमाणेे योग्य दर मिळत आहे . हे फक्त शुभम सोनमळे यांच्यामुळे सााध्य झाले असुन सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळ उत्पादकांच्याा माालाला दर्जाप्रमाणेे योग्य दर बाजारपेठेेेेत मिळवून देण्याचे काम उरेेशी बाळगून सातारा जिल्ह्यातील लिंब चे व्यापारी शुभम सोनमळे यांनी त्याचे नामांकित व्यापारी दाजी प्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या क्षेत्रात लक्ष वेधले. गेल्या काही वर्षापासून नवी मुंबईमधील वाशी एपीएमसी फळ मार्केटमध्ये उत्पादकांकडून फळ खरेदी करून होलसेल स्वरूपात विक्री करण्याचे कामास प्रत्यक्षात सुरूवात केली. यामुळे जिल्ह्यातील फळउत्पादक शेतकऱ्यांना आता योग्य दर मिळण्यास मदत होत असल्यामुळे शेतकर्यांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Comments
Post a Comment