पनवेल : राज्यातील सर्व घोषित, अघोषित विनाअनुदानित, स्वयंअर्थसाह्य तत्त्वावर कार्यरत प्राध्यापकांना तत्काळ वेतन द्यावे, अशी मागणी प्रा. हेमंत धायगुडे -पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन देवून केली आहे. राज्यात व देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असून, आॅनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षणाची सुविधा विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. विशेषत:घोषित, अघोषित विनाअनुदानित, स्वयंअर्थसाह्य तत्त्वावर कार्यरत प्राध्यापकांना अनुदान नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
राज्य सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या, अन्यायग्रस्त प्राध्यापकांच्या कुटुंबांना योग्य न्याय मिळवून द्यावा असे प्रा.धायगुडे- पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
Comments
Post a Comment