पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जाहिर केलेला लाॅकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह केला आहे. त्यानी निवेदनातून म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका हद्दीत सुरूवातीच्या काळात केंद्र शासनाने जाहीर केलेला व महाराष्ट्र शासनाने वाढवलेला असा लाॅकडाऊन हा २४ मार्च ते ३१ में पर्यत सुरू राहिला. काही प्रमाणात में महिन्यात व नंतर जून महिन्यात उद्योग, व्यवसाय व व्यापार यांची गाडी रुळावर येते ना येते तोच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या नावाखाली ३ जुलै पासून पुन्हा लाॅकडाऊन जाहिर झालेला आहे. मुळातच लाॅकडाऊन हे कोरोनाचे संक्रमण थांबल्यावरचा उपचार नाही. हे विविध क्षेत्रातील अनेक तज्ञांनी वारंवार बोलून दाखवले आहे. नागरिकांनी लाॅकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे (हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणे )व एकमेकांपासून किमान ३ फुटांचे शारिरीक अंतर पाळणे या सवयी लावून घेणे अभिप्रेत होते. मात्र सुरूवातीच्या काळात महाराष्ट्र सरकारकडून पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेमध्ये दैनंदिन कामासाठी मुंबईमध्ये जाणाऱ्या लोकांपासून त्यांच्या परिवारांना होणारे कोरोनाचे संक्रमण थांबवण्यात अपयश आल्यामुळे पनवेलमधील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र एकीकडे मुंबईमध्ये रुग्णांची संख्या रोज वाढत असताना संपूर्ण जुलै महिन्यात तिथे लाॅकडाऊन नाही, मात्र पनवेल महापालिकासारख्या क्षेत्रात लाॅकडाऊन लागू केला आहे. सदर लाॅकडाऊनच्या कालावधीत सातत्याने वाढ करून महानगरपालिका उद्योजकांचा व व्यापाऱ्यांचा अंत पाहत आहे. सर्वसामान्य नागरिकांना देखील लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तु कशा पध्दतीने मिळावाव्यात असा प्रश्न पडतो आहे. दुकान उघडल्याशिवाय ज्यांचा व्यवसाय होवू शकत नाही असे दुकानदार तसेच वेगवेगळ्या पध्दतीच्या सेवा पुरवणाऱ्या संस्था या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या रोजगारावरती या लाॅकडाऊनचा अनिष्ट परिणाम जाणवू लागला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत १५० ते २०० च्या घरात वाढणारी रोजची रूग्ण संख्या पाहता या रूग्ण संख्येला आवश्यक असणारे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्याची महापालिका अधिकार्यांची धडपड ही अपुरी पडते आहे अशी नागरिकांमध्ये स्पष्ट भावना आहे. या परिस्थितीमध्ये रुग्णांसाठी जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तसेच संभाव्य रुग्णांची स्वॅब टेस्ट तसेच रॅपिड अँटीबाॅडी टेस्ट जास्तीत जास्त प्रमाणात वाढवणे याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. तसेच ज्या उद्योग, अस्थापनांना आपले काम चालू ठेवायचे आहे, त्यांनी आपल्या उद्योग कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे व त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचाराचा खर्च उचलणे हे बंधनकारक करण्याची आवश्यकता आहे. मात्र केवळ लाॅकडाऊन करून महापालिका या सर्वांपासून सुटका करून घेऊ इच्छिते. याचा पनवेल परिसरातील नागरिकांमार्फत व पनवेल शहरातील विविध घटकामार्फत निषेध केला जात आहे. जनसामान्यांचा विचार करून महानगरपालिका हद्दीतील लाॅकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अन्यथा भारतीय जनता पार्टीला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनातून अधोरेखित केले आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment