Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

इंडिया बुल्स येथील बलात्कारप्रकरणी गुन्हेगारास कठोर शिक्षा करण्याची मागणी -गुरूनाथ पाटील

पनवेल : इंडिया बुल्स येथील कोरोना सेंटरमधील बलात्काराप्रकरणी गुन्हेगारास कठोर शिक्षा करण्याची मागणी शिवसेना उपमहानगर संघटक गुरूनाथ पाटील यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना निवेदन केले आहे.     गुरूनाथ पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंडिया बुल्स येथील कोरोना सेंटरमध्ये पुरूष व महिला विलीनीकरण केंद्र एकत्र असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच ही घटना घडल्याचा प्रकार निर्दयी आहे.     या प्रकरणात महिल्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पनवेल महानगरपालिकेने कोणतेही उपाययोजना न केल्याने हा अनुचित प्रकार घडला आहे. तरी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगारास कठोर शिक्षा करावी व तसेच येथील महिला विलीनीकरण केंद्रासाठी विशेष उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी गुरूनाथ पाटील यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना निवेदन केले आहे. 

पनवेल महानगरपालिका हद्दीतील लाॅकडाऊन तातडीने हटवा - आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जाहिर केलेला लाॅकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह केला आहे. त्यानी निवेदनातून म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका हद्दीत सुरूवातीच्या काळात केंद्र शासनाने जाहीर केलेला व महाराष्ट्र शासनाने वाढवलेला असा लाॅकडाऊन हा २४ मार्च ते ३१ में पर्यत सुरू राहिला. काही प्रमाणात में महिन्यात व नंतर जून महिन्यात उद्योग, व्यवसाय व व्यापार यांची गाडी रुळावर येते ना येते तोच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या नावाखाली ३ जुलै पासून पुन्हा लाॅकडाऊन जाहिर झालेला आहे. मुळातच लाॅकडाऊन हे कोरोनाचे संक्रमण थांबल्यावरचा उपचार नाही. हे विविध क्षेत्रातील अनेक तज्ञांनी वारंवार बोलून दाखवले आहे. नागरिकांनी लाॅकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे (हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणे )व एकमेकांपासून किमान ३

सातारा जिल्ह्यातील फळ उत्पादकांना नवी मुंबईत हक्काची स्थिर बाजारपेठ - शुभम सोनमळे

 लिंब : सातारा जिल्ह्यात कलिंगड , खरबूज,  पपई आणि डाळिंब ह्या फळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. पंरतु शेतकऱ्यांना या मालाला दर्जाप्रमाणे योग्य दर मिळत नव्हता.  लिंब गावाचे  युवा व्यापारी शुभम  सोनमळे यांच्या प्रयत्नातून कलिंगड , खरबूज , पपई आणि डाळिंब उत्पादकाना योग्य भावासाठी वाशी एपीएमसी फळ मार्केटमध्ये हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. तसेेच आता शेतकऱ्यांच्या मालाला दर्जाप्रमाणेे योग्य दर  मिळत आहे . हे फक्त शुभम सोनमळे यांच्यामुळे सााध्य झाले असुन सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळ उत्पादकांच्याा माालाला दर्जाप्रमाणेे योग्य दर  बाजारपेठेेेेत मिळवून देण्याचे काम उरेेशी बाळगून सातारा जिल्ह्यातील लिंब चे व्यापारी शुभम सोनमळे यांनी त्याचे नामांकित व्यापारी दाजी प्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या क्षेत्रात लक्ष वेधले.  गेल्या काही वर्षापासून नवी मुंबईमधील वाशी एपीएमसी फळ मार्केटमध्ये उत्पादकांकडून फळ खरेदी करून होलसेल स्वरूपात विक्री करण्याचे कामास प्रत्यक्षात सुरूवात केली. यामुळे जिल्ह्यातील फळउत्पादक शेतकऱ्यांना आता योग्य दर मिळण्यास मदत होत असल्यामुळे शेतकर्‍यांकडूनही त्य

सरस्वती कॉलेजच्या एन्एस्एस् युनिटचा ऑनलाईन जनजागृतीवर कौतुकास्पद उपक्रम

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.  ह्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी इतर देशासह भारतातही लाॅकडाऊन राबवण्यात येत आहे.  घरी सुरक्षित राहून घेता येणाऱ्या ऑनलाईन शिक्षणाला जगभरातून पसंती दर्शवण्यात येत आहे. ह्याच संधीचा लाभ घेत नवी मुंबईतील खारघरच्या सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध ऑनलाईन जनजागृतीवर उपक्रम हाती घेतले आहेत.       महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजूषा देशमुख तसेच एन्एस्एसचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ. सुनीता पाल व प्राध्यापक कवल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिनाभरात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहे.       दि.५ जून रोजी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन आणि ३ जूलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस या रोजी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करून साजरा करण्यात आला. सदर जनजागृतीवर उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळला. दि. १९ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देताना विविध आसने शिकवण्यात आले असून दि.२३ जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिनादिवशी महाविद्यालयीन स्वयंसेव

पनवेल महानगरपालिका हद्दीत निर्जंतुकीकरण व मच्छर धूर फवारणी करण्याबाबत मागणी - गुरूनाथ पाटील

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत निर्जंतुकीकरण व मच्छर धूर फवारणी करण्याची मागणी शिवसेना उपमहानगर संघटक गुरुनाथ पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे   या निवेदनात गुरूनाथ पाटील यांनी नमुद केले आहे की,  पावसाळा सुरू होऊन जवळ जवळ २० ते २५ दिवस उलटून गेले आहेत व तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निम्म्याहून लोक घाबरून आजार लपवत आहेत.हे आजार काही वेगळे नसून दरवर्षी पावसाच्या साचलेल्या पाण्यातून निर्माण झालेल्या मच्छरांनमुळे उध्दभवलेले साथीचे आजार आहेत, महानगरपालिका दरवर्षी निर्जंतुकीकरण फवारणी करत असते या वेळेस  कोरोनाच संकट असल्यामुळे फवारणीसाठी विलंब होत असल्याने सरळ सरळ नागरिकांच्या जिवाशी खेळ चालू आहे असे निदर्शनास येत आहे. म्हणून नागरी प्रश्नावर लक्ष वेधून पनवेल महानगरपालिका हद्दीत निर्जंतुकीकरण फवारणी व मच्छर धूर फवारणी लवकरात लवकर करून घ्यावी अशी मागणी गुरूनाथ पाटील यांनी केली

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला आॅक्सिजनाची सुविधा मिळणार

पनवेल : पनवेल उपजिल्हा रूग्णालयात एकूण दीडशे पैकी ९० बेडला ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. त्या कामाला सुरूवात झाली असून दोन ते तीन दिवसात ही सुविधा पूर्णपणे उपलब्ध होईल. त्या कोरोना रुग्णांची परवड थांबणार आहे. त्याच्यावर योग्य पध्दतीने उपचार करता येणार आहे.       पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हा आकडा तीन हजारांच्या ही वर पोहोचला आहे. तसेच ग्रामीण भागातही जवळपास एक हजार कोरोना रूग्ण आढळले आहेत. दररोज त्यामध्ये भर पडत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी होत होती. पनवेल उपजिल्हा रूग्णालय व कामोठे एमजीएम या कोविड रूग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड चीन कमतरता असल्याची वस्तुस्थिती समोर आली होती. त्यामुळे कोरोना रुग्णावर उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर संबंधित रूग्णांना सुध्दा आवश्यक तेवढे उपचार करताना डॉक्टरांचे हात तोकडे पडत होते. विशेष करून इतर आजार असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह याशिवाय वयोवृद्ध कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन

राज्य सरकारने प्राध्यापकांना वेतन द्यावे - प्राध्यापक हेंमत धायगुडे

    पनवेल : राज्यातील सर्व घोषित, अघोषित विनाअनुदानित, स्वयंअर्थसाह्य तत्त्वावर कार्यरत प्राध्यापकांना तत्काळ वेतन द्यावे,  अशी मागणी प्रा. हेमंत धायगुडे -पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन देवून केली आहे. राज्यात व देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असून, आॅनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षणाची सुविधा विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. विशेषत:घोषित, अघोषित विनाअनुदानित, स्वयंअर्थसाह्य तत्त्वावर कार्यरत प्राध्यापकांना अनुदान नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.       राज्य सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या, अन्यायग्रस्त प्राध्यापकांच्या कुटुंबांना योग्य न्याय मिळवून द्यावा असे प्रा.धायगुडे- पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

उद्योगातील कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलावा - आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील विविध उद्योगातील कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलणेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधा चौधरी यांच्याकडे महत्त्वपूर्ण सूचनावजा मागणी केली आहे.       यांना संदर्भात आ.ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले आहे.  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्या ह्या सामाजिक सुरक्षतेचे नियम पायदळी तुडवत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये मास्क न वापरणे,एकत्र जेवण करणे व निकषांपेक्षा  (प्रत्येकी तीन फुट) कमी अंतर पाळले जात असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग अनेकांना होत असून कंपनी व्यवस्थापनाकडून याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. अनेक कंपन्यांमार्फत त्यांच्या कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांवरती कामावर येण्याची सक्ती केली जात असताना शारिरीक अंतर अथवा सामाजिक सुरक्षेचे निकष पाळले जात नाहीतच मात्र उद्योगामध्ये काम करताना कोरोनाची लागण होवूनही अशा कामगारांच्या उपचारावरती मदत मिळवून देण्याबाबत त्यांना वार्‍यावरती सोडले जात आहे. या संदर्भात रा

खारघरमधील ग्रामविकासभवनमध्ये केव्हिड सेंटर सुरू करावे - गुरूनाथ पाटील

खारघर ग्रामविकास भवन येथे मार्चमध्ये कोव्हिड सेंटर सुरु होते. काही कारणास्तव पनवेल महानगरपालिकेने ते बंद करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अजूनही काही कोव्हिड सेंटर उभारणे गरजेचे आहे. ग्रामविकास भवन येथील कोव्हिड सेंटर खारघर परिसरातील लोकांसाठी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना सोईस्कर होईल व तसेच इंडियाबुल येथील सेंटरवरती येणारा रुग्णांचा तान कमी होईल.म्हणून कृपया ग्रामविकास भवनमध्ये लवकरात लवकर कोव्हिड सेंटर सुरू करण्यात यावे. अशी मागणी शिवसेना पनवेल उपमहानगर संघटक गुरूनाथ पाटील यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

उरण विधानसभा मतदार संघातील कसळखंड गावात राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे मोफत जंतुनाशक फवारणी

पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना विषाणू साथीचा आजार दिवसेंदिवस वाढत चालला असून यामुळे पनवेल तालुक्यात लायक डाऊन देखील वाढविण्यात आले आहे. पनवेल महानगर पालिका, पनवेल तालुक्यात समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्याप्रमाणे श्रीमंत छत्रपती मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चुभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडकेने उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून मोफत निर्जंतुकीकरण करण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे.  या अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील कसळखंड गावात मोफत जंतुनाशक फवारणी अभियान राबविण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या हस्ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला श्रीफळ फोडून व नमन करून जंतुनाशक फवारणीला सुरूवात करण्यात आली.  त्यावेळी कसळखंड ग्रामपंचायत सरपंच अनिल पाटील, दत्ता गायकर, राजे प्