स्व:क्रियाच्या डोळ्यात हि ती आता खूपत चालली आहे।
स्वताला एकांत आज्ञातवासात घेऊन चाललो आहे मी
तरी ही माझाच नावाचा ढोल सर्वत्र का पिटत चालला आहे तुम्ही।
जबाबदार कर्तव्यदक्ष भूमिकेशी प्रमाणिक जगण चुकीच झाल आहे
मतलबी स्वार्थी सोयीच्या जगणाच्या पध्दतीमुळे दुर झालो आहे मी।
प्रतिष्ठा सन्मान या साखळी दंडात बधिस्त मला करु नका
तुमच्या प्रति माझी भूमिका तपासल्यावर मग मात्र पश्चाताप करु नका।
दुरुनच समाजमाध्यमावर मला न्याहाळत बसू नका
माझ्या बदल चा अभिमान मला कधी तरी सांगून बघा।
व्ययक्तीक मदत मागता सार्वजणिक बहिष्कार करता दुपटी ह्या वागण्याला नातेवाईक तरी कसे म्हणता।
माझाच प्रतिमेने मला आता घायाळ केले आहे
भाव भावना व संवेदना माझ्या आता बोथट केल्या आहे।
माझ्याबदलची आसूया कशासाठी आणि का मलाच कळत नाही
काविळ झालेली तुमची पिवळी नजर माझावर का टिकत नाही।
सत्य आणि स्वच्छ पांढरी कपडे घालून मी आता कुठे लपू
त्याला डाग लागू नये यासाठी मी आता काय करु।
विचारांच माझ्या मनात काहूर माजल आहे
प्रेमाच्या बदल्यात मला प्रेम कधी मिळणार आहे।
माझ्या नैतिक नितिमान प्रामाणिक भूमिकेला अवाहान देऊ नका
मी जर तिरस्कार केला तर आयुष्यभर स्वताला दोष देत रडत बसू नका।
मला कोणाची कशाचीच भिती नाही
कारण मला माहीत आहे माझ्यामध्ये सर्वजन आपला फायदा शोधतात माझ्यातिल उपयुक्ता मात्र सर्वजन मान्य करतात।
अहंकार नाही आहे कशाचा मला स्वतावरचा विश्वास अनेक पटीने आहे मला।
काय करू माझीच प्रतिमा मला जड झाली आहे
स्वक्रियांच्या डोळ्यातही ती आता खूपत चालली आहे।
कवी/ लेखक/ पत्रकार - मुकेश शिंदे
९३२३५३८७९०
Comments
Post a Comment