मुकेश शिंदे
( प्रतिनिधी ) कोरोना पाश्वभूमीवर देशभर लॉक डाऊन सुरु आसून अनेक उघोग धंदे व्यवसाय बंद आहेत बेरोजगारी वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आसून खाजगी क्षेत्रात काम करणारे नोकरदार यांची गळचेपी होत आहे.लॉकडाऊन उठल्यानंतर आर्थिक संकटाची भित्ति अर्थतज्ञ्ज्ञ व्यक्त करतात यावर मात करायची असल्यास शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थनितिचा अभ्यास करावा असे प्रतिपादन सा. भिमसंग्रामचे संपादक मुकेश शिंदे यांनी १४एप्रिल २०२०रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर 129 जंयतीदिनी घरातूनच डिजिटिल जंयती कार्यक्रमास मार्गदर्शन करताना केले .उद्योग व्यवसायापासून सरकारला मिळणारा महसूल बंद झाला असून सरकारी व खाजगी क्षेत्रातील नोकरदार हवादील झाले आहेत . या आपतकालीन परीस्थितीतून संकटकाळातून बाहेर पडायचे असल्यास डाँ.आंबेडकराची अर्थनिती देशाला मार्गदर्शक ठरू शकते असे सांगून हातावर पोट आसणारे परप्रांतिय गोर गरीब व नाका कामगारांना मानवतेच्या दुष्टीकोनातून सरकारने त्वरीत मदत करावी असे आवाहान ही शेवटी मुकेश शिंदे यांनी केले
Comments
Post a Comment