गरीब कुटुंबांना केले धान्य वाटप
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्या पासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात सुरक्षित राहणे हा एकमेव पर्याय आहे. लॉक डाऊन परिस्थितीमध्ये हातावर पोट असणाऱ्यांसाठी मात्र जगणे अत्यंत अवघड बनले आहे. लॉक डाऊन परिस्थितीमध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न ज्यांच्या समोर निर्माण झाला आहे अशा लोकांच्या मदतीसाठी पनवेलची तालुका पत्रकार विकास मंच ही संस्था धावून गेली आहे.
रसायनी विभागातील कष्टकरी नगर येथील गोरगरीब जनतेला पनवेल तालुका पत्रकार मंच या संस्थेच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. पार्श्व वूमन या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने धान्य वाटप करण्यात आले. याबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील म्हणाले की आज परिस्थिती फार बिकट बनली आहे. विषाणूचे संक्रमण आटोक्यात आणले नाही तर लॉक डाऊन चा कालावधी वाढू देखील शकतो. अशा परिस्थितीमध्ये गरीब जनतेचे हाल होत आहेत. त्यांच्या मदती करता आम्ही आमचे खारीचे योगदान दिले आहे. अशाच प्रकारे सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन हातभार लावल्यास कोरोना विषाणू विरुद्ध ही लढाई आपण विनासायास जिंकू.
धान्य वाटप कार्यक्रमाचे वेळी माधव पाटील यांच्यासमवेत पनवेल तालुका पत्रकार विकास मंच चे सचिव हरीश साठे, अनिल भोळे, दिपक घोसाळकर, आनंद पवार, ग्रामपंचायत तुराडे च्या सदस्य गुरुबाई राठोड,सदस्य विश्वनाथ गायकवाड,सुनील राठोड,दादासाहेब अटपाडकर,अशोक सोनावणे,राजू पवार,रवी राठोड,गणेश सोनावणे आदी मान्यवरांच्या समवेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment