पनवेल / प्रतिनिधी : सध्या देशात कोरोना आजारामुळे सर्वत्र लाॅकडाऊन परिस्थिती आहे अशा परिस्थितीत कामगार वर्ग, कंत्राटी कामगार, हातावर पोट असलेले कामगार यांचे अतोनात हाल होत आहेत. आजची परिस्थिती बघता अनेक ठिकाणी बेरोजगारीमुळे उपासमार व भूकमारी होत असल्याची चिन्हे आहेत. उपासमारीमुळे कोणाचा बळी जाऊ नये हा हेतूने पनवेलमधील पत्रकारांची सेवाभावी संस्था पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्याकडून ज्या ठिकाणी खरोखर उपासमार आहे व ज्याठिकाणी एका वेळचे अन्न देखील काही लोकांना मिळत नाही अशा गरजू ठिकाणी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यात अद्यापही अनेक अशा आदीवासी वाड्या, अनेक गरीब वस्ती आहेत जिथे अद्यापही मदत पोहचली नाही त्याठिकाणचा शोध घेऊन त्याठीकाणी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून करणार असल्याचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार आज पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील कोळवाडी यंतेहील आदिवासी वाडीवर गरीब - गरजू नागरिकांना तांदूळ, कांदा - बटाटे, तेल, डाळ व लसूण या जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पत्रकारिता करीत असताना आपण समाजाचे पण काही देणे लागतो या हेतूने सध्या चाललेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक आदिवासी वाडी व पाड्यावरील कुटुंब हि उपाशी झोपत आहेत त्याची दखल घेऊनच पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांना या सेवेबद्दल माहिती व्हावी व त्या अनुषंगाने त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्यासाठी हे प्रसिद्धी केली जात असून ज्या दानशूर लोकांना जीवनाश्यक वस्तू द्यायच्या असतील त्यांनी समितीच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील समितीतर्फे करण्यात आले आहे. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस मंदार दोंदे, कार्याध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, खजिनदार केवल महाडिक, सल्लागार विवेक पाटील, सदस्य दीपक महाडिक, संतोष भगत, अनिल कुरघोडे, दीपक घोसाळकर, अनिल कुरघोडे, सुनील कटेकर, प्रवीण मोहोकर, राजेश डांगळे, वचन गायकवाड, विलास मोरे, उद्योजक संजय नोगजा, युथ फोरमचे केवल गायकवाड, असीम शेख आदींसह संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment