खांदा कॉलनीमधील मंगल आश्रय सामाजिक संस्थमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहुन शिकण्यासाठी व तसेच स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी १० ते १२ निराधर मुली आहेत.त्या मुलीना स्वताचे आस्तित्व उभे करण्यासाठी संस्थाच्या अध्याक्षा श्रीमंती मंगल सरोदे मदत करत आहेत. परंतु सध्याची लाॕकडाऊनच्या परिस्थितीत त्यांना त्या मुलींच्या सर्व गरजा भागविणे अवघड होत असल्यामुळे संस्थेचे अध्यक्षा यांनी अॅड संतोषी चव्हाण यांना संदेश पाठवला . या परिस्थितीचा आढावा घेत राजे प्रतिष्ठाण व जिजाऊ फाऊंडेशन खारघर यांच्या संयुक्त नियोजनाने १३ एप्रिल रोजी एक ते दीड महीना पुरेल एवढे डाळी ,तांदुळ,मसाला, हळद, तेल, साबन बिस्कीटचे पाकीटस इत्यादी वाटप केले. त्यावेळी राजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष केवल महाडीक व खांदा काॅलानीचे अध्यक्ष किरण पालये व आश्रमाचे व्यवस्थापक उपस्थित होते.यापुढेही महिलांच्या हितासाठी लागेल ती मदत मी करत राहील असे सांगत त्यांना धीर दिला .तसेच मंगल आश्रय सामाजिक संस्थेचे अध्यक्षा व मुलींनी राजे प्रतिष्ठाण व जिजाऊ फाऊंडेशन चे आभार मानले .
खरच मंगल आश्रय सामाजिक संस्थेला जीवनाउपयोगी वस्तूंची गरज आहे जर आपण कोणी मदत करु इच्छित असाल तर नक्कीच संपर्क करा .
एक हात मदतीचा लाख मोलाचा ठरेल
संपर्क : ॲड.संतोषी चव्हाण 8779219910
राजे प्रतिष्ठाण ,अध्यक्ष खारघर
जिजाऊ फाऊंडेशन ,खारघर
तनिष्का गृप सदस्य खारघर
पोलास मिञ समन्वय समिती पनवेल अध्यक्ष
Comments
Post a Comment