*मनातल ते गुपित उघड करायचं नसतं.*
*संसाराचा हा खेळ आता उगच मोडायचं नसतं.*
*अंतरमनातलं चित्र डोळयांमध्ये साठवायचं असतं.*
*मनाचा लपंडाव कधीच उघड करायचं नसतं.*
*बुध्दी आणि मन यांच्यातला कलगीतुरा नकोसा झालाय आता.*
*तिच्या आठवणीने स्वप्नांत रडणे कायमचं झालयं आता.*
*भाव-भावना स्पंदन यांचा मनात कल्लोळ माजला आहे.*
*वास्तववादी जगात मन रमेनासं झालं आहे.*
*तिच्या आस्तित्वांची जाणीव जगण्याला बळ देते.*
*कारण नसताना आतून खूश होणे हा रोग देते.*
*भूतकाळात डोकावल्यावर अंगावर शहारे येतात.*
*आठवणीच्या साठवणीमुळे जगणे असहाय्य करतात.*
*तू न बोलताच मला कसं ऐकायला येतं.*
*शब्द तुझे ओठ माझे हे असं कसं होतं.*
*तुझे फोटो न्याहाळत असतो*
*तुझ्या आठवणी कुरुवाळत असतो.*
*कुणाला सांगू नकोस त्यावरच आयुष्य रेटत असतो.*
*तुला शुभेच्छा देण्यासाठी मन आतूर होतं, पण त्यात मी नसल्यामूळे दुःख ही होतं.*
*तुझ्याबद्दलची माहीती मी जगाकडून घेत असतो.*
*तु माझ्या मनात आहे हे माहीत असून ही हे असं कसं होतं.*
*तुला चोरुन चोरुन बघणे आता नित्याचच झालं आहे.*
*तुला गमावण्याच्या भितीने मन व्याकूळ झाल आहे.*
*तुझा नवरा जगातला सर्वात श्रीमतं असा मला भास होतो.*
*तुझ्या रूपात त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी बघून मी खल्लास होतो.*
*तुझ्या माझ्या प्रेमाचे रहस्य कधीच उलगडू नको.*
*आपल्या पवित्र प्रेमाला ही दुनिया लफडे म्हणेल.*
*तूझ्या पवित्र्याला व माझ्या नैतिकतेला बदनाम करेन.*
*सात जन्माचा तूझा करारनामा आता तू संपवून टाक.*
*निदान पुढच्या जन्मी तरी तू माझी हो नाही तर माझ अस्तित्व मिटवून टाक.*
*आता मी शेवट करतो वास्तव मला जाग करतयं.*
*स्वप्ननगरीची तू देवी तूला नारळ फोडून मी आता पलायन करतोय.*
*त्या आठवणी हदयात घेऊनचं जगाचा निरोप घेईल.*
*माझ्या प्रेताला जास्त रडू नकोस उगीच कोणाला शंका येईल.*
*मनातल ते गुपित कोणाला कधीच सांगू नको.*
*हे जग जगू देणार नाही उगीच मग मला दोष देऊ नको.*
*कवी लेखक* *पत्रकार- मुकेश शिंदे*
*मोबाईल नंबर-९३२३५३८७९०*
*(तूझा कधीचं न झालेला तरीही तुझ्यातचं रमणारा )❤💝💕*
*साभार - घालमेल या स्व आत्मकथेतून.*
Comments
Post a Comment