इडलवाईज इंश्युरन्स कंपनीमुळे युवकाला मिळणार जीवनदान ! किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दिले २५ लाख !
मुकेश शिंदे
पनवेल., "नवलोकहित दृष्टी " वृत्तसेवा : भारतातील अग्रणी विमा कंपनी म्हणून ओळ्खल्या जाणाऱ्या इडलवाईज टोकीयो लाईफ इंश्युरन्स कंपनीमुळे मुंबईतील दिनेश कोल्हे नामक युवकाला जीवनदान मिळणार आहे. इडलवाईज इंश्युरन्स कंपनीने या तरुणाला किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश तात्काळ अदा केला.
कुठलीही इंश्युरन्स कंपनी आपल्या ग्राहकांना कशी सेवा परतावा व दावा देते यावर त्या कंपनीची विश्वासहर्ता तपासली व ओळखली जाते.पी .एल .लोखंडे मार्ग चेंबूर मुबंई येथे वास्तव्यास असलेल्या २६ वर्षीय दिनेश कोल्हे नावाच्या युवकाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तो रुग्ण डायलेसेसवर होता. डाँक्टरांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मध्यमवर्गीय असलेल्या कोल्हे कुटुंबावर उपचारासाठीच्या खर्चाचे मोठे आर्थिक संकट उभे राहिले.
सुदैवाने दिनेश कोल्हे याने इडलवाईज कंपनीची इंश्युरन्स पॉलीसी खरेदी केली होती. त्यांचे वैयक्तिक सल्लागार रोशन शेट्टी यांनी सदर बाब कंपनीचे वरीष्ट डेव्हपलमेंट मॅनेजर शोभा पाटील -मोकाशी यांना कळविले. त्यांनी तात्काळ खारघर शाखा प्रकल्प सागर वर्तक, बिझनेस डेव्हलपमेंट पार्टनर रेणु मिश्रा यांच्या सहकार्याने कंपनीच्या वरिष्ठ पातळीवर सुञे हलविली.संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन पडताळणी केली. ३१ मार्च रोजी कंपनीकडून कोल्हे कुटूंबियांना २५ लाखांचा धनादेश पुढील उपचारासाठी देण्यात आला. किडनी प्रत्यारोपण शस्ञक्रीयेनंतर लवकरच हा तरुण पुन्हा आपले नवीन आयुष्य जगणार आहे. कोल्हे कुटूंबीयांनी इडलवाईस इन्शुरन्स कंपनी खारघर शाखे बरोबर आपले सल्लागार रोशन शेट्टी व मॅनेजर शोभा पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत. मोठा वैद्कीय उपचार खर्च मध्यम वर्गीय गरीब कुटूंबीयाना परवडत नसल्याने त्यांनी कृपया आपला विमा जरुर करावा, असे अवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. इन्शुरन्स कंपनीच्या या तात्काळ सेवाकार्याबदद्ल इन्शुरन्स वर्तुळात समाधान आणि आनंद वक्त होत आहे. सध्याच्या कोरोना लॉकडाऊन काळात इन्शुरन्सचे महत्व लक्षात घेता खारघर परिसरात सदर घटनेची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे़.
Comments
Post a Comment