श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगारसेनेतर्फे रिक्षाचालकांच्या उपचारासाठी २५००० धनादेश महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीकडे सुपूर्द
पनवेल/ प्रतिनिधी : सध्या देशभर कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असुन १४ एप्रिलपर्यत लॉकडाऊन असल्याने बऱ्याच रिक्षा चालकांचे हातावर पोट आहे. अगोदरच रिक्षा परमिट खुले केल्यामुळे रिक्षाची वाढ झाली रिक्षा व्यवसाय कमी झाला हप्ते भरायला अडचण निर्माण झाली होती रिक्षा व्यवसाय करून घर चालवणं कठीण झालं आता लॉकडाऊनमुळे पूर्ण रिक्षा व्यवसाय बंद झाल्याने रिक्षा चालकावर उपास मारीचा वेळ आली असून रिक्षावर असलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. आधीच आर्थिक बेरोजगारी व त्यामध्ये कोरोनाचे संकट यामुळे सर्वसाधारण रिक्षाचालक हवालदिल झाला आहे. नुकतेच खारघर येथे कोरोनाची लागण रिक्षाचालकाला झाली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असून रिक्षाचालक आता भयभीत झाला आहे. कारण आधीच हातात पैसा नाही रिक्षा दारासमोर उभी आहेच त्यातच कर्जाचे हफ्ते भरायचे आहेत अशात कोरोना रोगाची लागण झाल्यास रिक्षाचालकाला कोरोनाची चाचणी व कुटुंबाचा खर्च चालवणे अवघड जाईल. या सर्वांची जाणीव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने व अध्यक्षजितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटकप्रमुख, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रकाश भाई कोळी, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस चंद्रकांत (मामा) धडके यांच्या मार्गदर्शनानुसार पनवेल मधील रिक्षाचालकांना कोरोनाची लागण झाल्यास राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी रिक्षाचालकांवर तात्काळ उपचार व्हावेत या हेतूने महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्याकडे २५००० रुपयांचा धनादेश दिला आहे. तसेच लवकरच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने परिसरातील रिक्षाचालकांसाठी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप लवकरच करण्यात येणार असल्याचे केवल महाडिक यांनी सांगितले. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
Comments
Post a Comment