पनवेल प्रतिनिधी) : कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशात लाॅकडावून केले आहे महाराष्ट्रातली परिस्थिती दिवसागणिक पेशंट वाढत असल्याचे चित्र आहे अशातच अतिशय गांभीर्याने याकडे सरकार लक्ष घालत आहे याकरिता अधिकाधिक कठोर पावले सरकारकडून उचलली जात आहेत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने या काळात अनेक व्यवसाय बंद आहेत. हातावर पोट असलेल्यांचे काम नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशां कष्टकरी, कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटूंबियांना जे.एम.म्हात्रे संस्थेच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे सुमारे 2000 कुटुंबांना एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जे. एम. म्हात्रे संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांनी दिली आहे. लाॅकडावून काळात श्रमिक, कामगार, हातावर पोट, असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप जे.एम. म्हात्रे संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार असून या जीवनावश्यक वस्तू मध्ये पाच किलो तांदूळ,पाव किलो चहा पावडर ,एक कीलो तेल, काही मसाला एक कीलो तूरडाळ, साबण यांचा समावेश आहे हे 2000 पॅकेट प्रांताधिकारी दत्तात्रय नवले तसेच पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार असून शासकीय यंत्रणा सदर साहित्य गरजू गरीब श्रमिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल. अडचणीच्या काळात जे.एम. म्हात्रे संस्था श्रमिक, कामगार ,कष्टकरी ,यांच्या करिता धावून आल्याने समाजातील सर्वच थरातून संस्थेचे कौतुक होत आहे पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून अनेक गरीब गरजू कुटुंबांना निश्चितच एक महिना का होईना पण आधार मिळणार आहे. जेव्हा जेव्हा पनवेल वर संकटाची वेळ आली तेव्हा तेव्हा माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे पनवेलकरांच्या मदतीला धावून ऊन आलेले दिसत आहेत. मग 2005 चा पुर असो किंवा कुठल्याही सामाजिक उपक्रम असो जे.एम. म्हात्रे हे सातत्याने सढळ हस्ते नागरिकांसाठी मदत करत असतात अतिशय गरीब कुटूंबातून नामवंत उद्योजक म्हणून नावलौकिक असलेले जे एम. म्हात्रे यांच्यातील माणुसकी पाहता अनेक उद्योजकांनी असे सढळ हस्ते मदत करावी मदत करून नागरिकांना धीर द्यावा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याची जबाबदारी पेलावी हाच आदर्श सर्वांनी समोर ठेवला पाहिजे. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये कठीण काळात जे जे धावून जातात तेच संस्कारी गुणवान असतात यापैकी जे.एम.म्हात्रे हे एक व्यक्तिमत्व असून सामाजिक जबाबदारीचे भान ठेवता आपल्या जे.एम म्हात्रे इन्फ्रा प्रोजेक्ट मधील कामगारांनाही त्यांनी कशाचीच कमी पडू दिले नाही शिवाय लॉक डाऊन सुरू झाल्यापासून ज्या ज्या ठिकाणी त्यांचे काम सुरू आहे त्या आजूबाजूच्या गावांना ही ते मदत करीत असल्याचे दिसून येत आहे त्याचप्रमाणे पनवेल परिसरात अनेक ठिकाणी गरजूंना नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण असे 800 ते 900 लोकांना अन्नदान जे .एम.म्हात्रे संस्थेच्या माध्यमातून रोज होत असल्याचे दिसून येत आहे याशिवाय कोरोना आजारांचा फैलाव होऊ नये याकरिता रात्रंदिवस नागरिकांचे संरक्षण करीत असलेल्या कायदा व सुव्यवस्थेचे काम करणाऱ्या पोलिस बांधवांना आपले काम करत असताना थकवा येऊ नये याकरिता एनर्जी ड्रिंक चे ही वाटप संस्थेच्या माध्यमातून सातत्याने होत आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment