पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती करणार जीवनाश्यक वस्तूंचे वाटप. दानशूर व्यक्तींना दान करण्याचे समितीतर्फे आवाहन
पनवेल / प्रतिनिधी : सध्या देशात कोरोना आजारामुळे सर्वत्र लाॅकडाऊन परिस्थिती आहे अशा परिस्थितीत कामगार वर्ग, कंत्राटी कामगार, हातावर पोट असलेले कामगार यांचे अतोनात हाल होत आहेत. आजची परिस्थिती बघता अनेक ठिकाणी बेरोजगारीमुळे उपासमार व भूकमारी होत असल्याची चिन्हे आहेत. उपासमारीमुळे कोणाचा बळी जाऊ नये हा हेतूने पनवेलमधील पत्रकारांची सेवाभावी संस्था पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्याकडून ज्या ठिकाणी खरोखर उपासमार आहे व ज्याठिकाणी एका वेळचे अन्न देखील काही लोकांना मिळत नाही अशा गरजू ठिकाणी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यात अद्यापही अनेक अशा आदीवासी वाड्या, अनेक गरीब वस्ती आहेत जिथे अद्यापही मदत पोहचली नाही त्याठिकाणचा शोध घेऊन त्याठीकाणी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप आम्ही संघर्ष समितीचे जेष्ठ सल्लागार माधवराव पाटील व सुनील पोतदार यांच्या मार्गदर्शनानुसार पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून करणार असल्याचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी सांगितले. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांना या सेवेबद्दल माहिती व्हावी व त्या अनुषंगाने त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्यासाठी हे प्रसिद्धी केली जात असून ज्या दानशूर लोकांना जीवनाश्यक वस्तूं द्यायच्या असतील त्यांनी समितीच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील समितीतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी खजिनदार केवल महाडिक,सरचिटणीस मंदार दोंदे,कार्याध्यक्ष संजय कदम,सल्लागार विवेक पाटील हे विशेष मेहनत घेत आहेत.
Comments
Post a Comment