लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली
आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली
आता पर्यंत १० हजारून अधिक गरीब, गरजूंना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल(प्रतिनिधी) कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मदतकार्य सुरु ठेवले असून पनवेलमध्ये असलेल्या सर्व झोपडपट्टी वसाहत, दुर्गम भाग, आदिवासी बांधव, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल तालुका व शहरात आतापर्यंत १० हजार ५० गरीब गरजू कुटुंबाना मदत केली गेली आहे.
कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगारापासून दूर रहावे लागत आहे अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटूंबिय उपाशी राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गरीब,गरजूंना तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंची मदतकार्य सुरु केले. आजपर्यंत १० हजार ५० कुटुंबियांना या जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या असून
पनवेल भाजपच्यमाध्यमातून हे मदत कार्य पुरविण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या लोकप्रतितिनिधींनीही योगदान दिले आहे. दरम्यान भाजप- आरपीआय युतीच्या सर्व ५४ नगरसेवकांनी आपले महापालिकेचे दोन महिन्याचे मानधन महापौर सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेऊन तसे पत्र कार्यवाहीला आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे. त्याचबरोबर भाजप नगरसेवक लोकप्रतिनिधी महापालिका क्षेत्रात लोकांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदत कार्य करीत आहेत.
Comments
Post a Comment