खारघर : करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, दिवसेंदिवस मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा ओघ वाढला असून मराठा समाज खारघर यांच्या वतीने १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आला.
खारघर परिसरात मराठा समाजातील बांधवांनी एकत्र येऊन हि मदत केली असून पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांसोबतच उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले आणि उप आयुक्त जमीर लेंगरेकरयांच्याकडे मराठा समाज खारघर यांचे प्रतिनिधी हर्षल भदाणे पाटील यांनी हा धनादेश सुपूर्त केला. मराठा समाज, खारघरमधील या आधीही पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांसाठी असो वा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी, खारघरमधील मराठा समाजाने नेहमी एकत्र येऊन सढळ हाताने मदत केली असून, सार्वजनिक स्तरावर एकत्र येऊन सामाजिक ऐक्य आणि बांधिलकी जपण्याचा मराठा समाजाचे उद्धिष्ट असल्याचे मराठा समाज खारघरचे अध्यक्ष प्राचार्य बी. ए. पाटील यांनी सांगितले.
संस्थेचे कार्यध्यक्ष कालिदास देशमुख, सचिव प्रताप पाटील, खजिनदार नवले, शशिकांत जाधव, सौ राजश्री कदम, सौ अलका कदम, सौ वृषाली शेडगे, अर्जुन गरड, संजय कंदारे, इत्यादि मंडळीने एक मताने ठराव करुन हि मदत उभी केली असल्याचे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय कंधारे यांनी सांगितले.
मराठा समाज, खारघर यांनी केलेली मदत कौतुकातस्पद असून इतर सामाजिक संस्थांनीही अश्याप्रसंगी मदत करावी. मुख्यमंत्री सहायत्ता निधी सोबतच पनवेल महानगरपालिकेतर्फे महापौर सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात आली असून याद्वारेही आपण गरजवंतांसाठी मदत करू शकता. - गणेश देशमुख, पनवेल महानगरपालिका - आयुक्त
Comments
Post a Comment