Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

पनवेल महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व सदर क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या-त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी-गुरूनाथ पाटील

    पनवेल, दि.27 (वार्ताहर): पनवेल महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व सदर क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या-त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेना पनवेल उपमहानगर संघटक गुरूनाथ पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात शिवसेना पनवेल उपमहानगर संघटक गुरूनाथ पाटील यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रूग्णांची संख्या जवळपास 50च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोना संक्रमण रोखण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य जनता ही काही अपवाद वगळता लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत आहे. मात्र आजवर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची वर्गवारी केल्यास 30 पेक्षा जास्त रूग्ण हे पनवेल तालुक्याबाहेर अत्यावश्यक सेवा देणारे सीआरएफएस जवान, डॉक्टर, परिचारीका, पोलिस असल्याचे आढळून आले आहे. त्याचाच अर्थ पनवेल तालुका रायगड जिल्ह्याबाहेर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या शासकीय व खाजगी अस्थापनातील अधिकारी व कर्मचारी यांची व्यवस्था कामाच्या ठि

मनातलं गुपित

  *मनातल ते गुपित उघड करायचं नसतं.* *संसाराचा  हा खेळ आता उगच मोडायचं  नसतं.* *अंतरमनातलं चित्र डोळयांमध्ये साठवायचं असतं.* *मनाचा लपंडाव कधीच उघड करायचं  नसतं.* *बुध्दी आणि मन यांच्यातला कलगीतुरा नकोसा झालाय आता.*  *तिच्या आठवणीने स्वप्नांत रडणे कायमचं झालयं आता.* *भाव-भावना स्पंदन यांचा मनात कल्लोळ माजला आहे.* *वास्तववादी जगात मन रमेनासं  झालं आहे.* *तिच्या आस्तित्वांची जाणीव जगण्याला बळ देते.* *कारण नसताना आतून खूश होणे हा रोग देते.*  *भूतकाळात डोकावल्यावर अंगावर शहारे येतात.* *आठवणीच्या साठवणीमुळे जगणे  असहाय्य करतात.* *तू न बोलताच मला कसं ऐकायला येतं.* *शब्द तुझे ओठ माझे हे असं कसं होतं.* *तुझे फोटो न्याहाळत असतो*  *तुझ्या आठवणी कुरुवाळत असतो.* *कुणाला सांगू नकोस त्यावरच आयुष्य रेटत असतो.* *तुला शुभेच्छा देण्यासाठी मन आतूर होतं, पण त्यात मी नसल्यामूळे दुःख ही होतं.* *तुझ्याबद्दलची माहीती मी जगाकडून घेत असतो.* *तु माझ्या मनात आहे हे माहीत असून ही हे असं कसं होतं.* *तुला चोरुन चोरुन बघणे आता नित्याचच झालं  आहे.* *तुला गमावण्याच्या भितीने मन व्याकूळ झाल आहे.* *तुझा नवरा जगातला सर्वात

माझीच प्रतिमा आता मला जड झाली आहे 

स्व:क्रियाच्या डोळ्यात हि ती आता खूपत चालली आहे।     स्वताला एकांत आज्ञातवासात घेऊन चाललो आहे मी  तरी ही माझाच नावाचा ढोल सर्वत्र का पिटत चालला आहे तुम्ही।     जबाबदार कर्तव्यदक्ष भूमिकेशी प्रमाणिक जगण चुकीच झाल आहे  मतलबी स्वार्थी सोयीच्या जगणाच्या पध्दतीमुळे दुर झालो आहे मी।     प्रतिष्ठा सन्मान या साखळी दंडात बधिस्त मला करु नका  तुमच्या प्रति माझी भूमिका तपासल्यावर मग मात्र पश्चाताप करु नका।    दुरुनच समाजमाध्यमावर मला न्याहाळत बसू नका  माझ्या बदल चा अभिमान मला कधी तरी सांगून बघा। व्ययक्तीक मदत मागता सार्वजणिक बहिष्कार करता दुपटी ह्या वागण्याला नातेवाईक तरी कसे म्हणता। माझाच प्रतिमेने मला आता घायाळ केले आहे  भाव भावना व संवेदना माझ्या आता बोथट केल्या आहे। माझ्याबदलची आसूया कशासाठी आणि का मलाच कळत नाही  काविळ झालेली तुमची पिवळी नजर माझावर का टिकत नाही। सत्य आणि स्वच्छ पांढरी कपडे घालून मी आता कुठे लपू  त्याला  डाग लागू नये यासाठी मी आता काय करु। विचारांच माझ्या मनात काहूर माजल आहे  प्रेमाच्या बदल्यात मला प्रेम कधी मिळणार आहे। माझ्या नैतिक नितिमान प्रामाणिक भूमिकेला अवाहान देऊ नका  मी

कोरोना पाश्वभूमीवर आर्थिक संकट थोपवण्यासाठी डॉ.आंबेडकरांच्या अर्थनितीचा अभ्यास करा

मुकेश शिंदे  ( प्रतिनिधी ) कोरोना पाश्वभूमीवर देशभर लॉक डाऊन सुरु आसून अनेक उघोग धंदे व्यवसाय बंद आहेत बेरोजगारी वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आसून  खाजगी क्षेत्रात काम करणारे नोकरदार यांची गळचेपी होत आहे.लॉकडाऊन उठल्यानंतर आर्थिक  संकटाची भित्ति अर्थतज्ञ्ज्ञ व्यक्त करतात यावर मात करायची असल्यास शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थनितिचा अभ्यास करावा असे प्रतिपादन सा. भिमसंग्रामचे संपादक मुकेश शिंदे यांनी १४एप्रिल २०२०रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर 129 जंयतीदिनी घरातूनच डिजिटिल जंयती कार्यक्रमास मार्गदर्शन करताना केले .उद्योग व्यवसायापासून सरकारला मिळणारा महसूल बंद झाला असून सरकारी व खाजगी क्षेत्रातील नोकरदार हवादील झाले आहेत . या आपतकालीन परीस्थितीतून संकटकाळातून बाहेर पडायचे असल्यास डाँ.आंबेडकराची अर्थनिती देशाला मार्गदर्शक ठरू शकते असे सांगून हातावर पोट आसणारे परप्रांतिय गोर गरीब व नाका कामगारांना मानवतेच्या दुष्टीकोनातून सरकारने त्वरीत मदत करावी असे आवाहान ही शेवटी मुकेश शिंदे यांनी केले

राजे प्रतिष्ठाण व जिजाऊ फाऊंडेशन खारघर यांच्या संयुक्त नियोजनाने जीवनावश्यक वस्तुचे वाटप 

खांदा कॉलनीमधील  मंगल आश्रय सामाजिक संस्थमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहुन शिकण्यासाठी व तसेच स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी १० ते १२ निराधर मुली आहेत.त्या मुलीना स्वताचे आस्तित्व उभे करण्यासाठी संस्थाच्या अध्याक्षा श्रीमंती मंगल सरोदे मदत करत आहेत. परंतु सध्याची लाॕकडाऊनच्या  परिस्थितीत त्यांना त्या मुलींच्या सर्व गरजा भागविणे अवघड होत  असल्यामुळे संस्थेचे अध्यक्षा यांनी अॅड संतोषी चव्हाण यांना संदेश पाठवला . या परिस्थितीचा आढावा घेत राजे प्रतिष्ठाण व जिजाऊ फाऊंडेशन खारघर यांच्या संयुक्त नियोजनाने १३ एप्रिल रोजी एक ते दीड महीना पुरेल एवढे डाळी ,तांदुळ,मसाला, हळद,  तेल, साबन बिस्कीटचे पाकीटस इत्यादी वाटप केले. त्यावेळी  राजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष केवल महाडीक व खांदा काॅलानीचे अध्यक्ष किरण पालये व आश्रमाचे व्यवस्थापक उपस्थित होते.यापुढेही महिलांच्या हितासाठी लागेल ती मदत मी करत राहील असे सांगत त्यांना धीर दिला .तसेच मंगल आश्रय सामाजिक संस्थेचे अध्यक्षा व मुलींनी  राजे प्रतिष्ठाण व जिजाऊ फाऊंडेशन चे आभार मानले .       खरच मंगल आश्रय सामाजिक संस्थेला जीवनाउपयोगी  वस्तूंची गरज आहे जर आपण कोणी मद

पत्रकार मित्र असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टच्यावतीने निराधार मुलींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल/प्रतिनिधी: पत्रकार मित्र असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल खांदा कॉलनी येथील निराधार मुलींच्या आश्रमातील मुलींना मदतीचा हात म्हणून जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. इतर सामाजिक संस्था या गरीब गरजूंना वस्तू व अन्न वाटप करीत आहेत मात्र सध्या लॉकडाऊन काळामध्ये निराधार मुले- मुली वास्तव्य करीत असलेल्या आश्रमाची परिस्थिती बिकट आहेत अशातच त्यांना दुकानदार धान्य शिल्लक नाही असे कारण देत असल्याने ते चिंतीत होते त्यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला पत्रकार मित्र असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांनी जीवनाश्यक वस्तू देऊन मदतीचा हातभार लावला आहे. तसेच ऍड. संतोषी चव्हाण यांनी देखील जीवनाश्यक वस्तू या मुलींना देऊ केल्या आहेत व वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, सचिव व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे ऍड. मनोहर सचदेव, समाजसेविका ऍड. संतोषी चव्हाण, किरण पालये व आश्रमाचे व्यवस्थापक उपस्थित होते.

पनवेल भाजपतर्फे आतापर्यंत १० हजारून अधिक गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

    लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली  आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  आता पर्यंत १० हजारून अधिक गरीब, गरजूंना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप   पनवेल(प्रतिनिधी) कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मदतकार्य सुरु ठेवले असून पनवेलमध्ये असलेल्या सर्व झोपडपट्टी वसाहत, दुर्गम भाग, आदिवासी बांधव, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल तालुका व शहरात आतापर्यंत १० हजार ५० गरीब गरजू कुटुंबाना मदत केली गेली आहे.             कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांना  रोजगारापासून दूर रहावे लागत आहे अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटूंबिय उपाशी राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गरीब,गरजूंना तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, त

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगारसेनेतर्फे रिक्षाचालकांच्या उपचारासाठी २५००० धनादेश महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीकडे सुपूर्द   

                                                                                                                                   पनवेल/ प्रतिनिधी : सध्या देशभर कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असुन १४ एप्रिलपर्यत लॉकडाऊन असल्याने बऱ्याच रिक्षा चालकांचे हातावर पोट आहे. अगोदरच रिक्षा परमिट खुले केल्यामुळे रिक्षाची वाढ झाली रिक्षा व्यवसाय कमी झाला हप्ते भरायला अडचण निर्माण झाली होती रिक्षा व्यवसाय करून घर चालवणं कठीण झालं आता लॉकडाऊनमुळे पूर्ण रिक्षा व्यवसाय बंद झाल्याने रिक्षा चालकावर उपास मारीचा वेळ आली असून रिक्षावर असलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. आधीच आर्थिक बेरोजगारी व त्यामध्ये कोरोनाचे संकट यामुळे सर्वसाधारण रिक्षाचालक हवालदिल झाला आहे. नुकतेच खारघर येथे कोरोनाची लागण रिक्षाचालकाला झाली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असून रिक्षाचालक आता भयभीत झाला आहे. कारण आधीच हातात पैसा नाही रिक्षा दारासमोर उभी आहेच त्यातच कर्जाचे हफ्ते भरायचे आहेत अशात कोरोना रोगाची लागण झाल्यास रिक्षाचालकाला कोरोनाची चाचणी व कुटुंबाचा खर्च चालवणे अवघड जाईल. या सर्वांची जाणीव श्रीमंत छत्रपती शिवाजी मह

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे कोळवाडी येथील आदिवासी वाडीवर जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

  पनवेल / प्रतिनिधी : सध्या देशात कोरोना आजारामुळे सर्वत्र लाॅकडाऊन परिस्थिती आहे अशा परिस्थितीत कामगार वर्ग, कंत्राटी कामगार, हातावर पोट असलेले कामगार यांचे अतोनात हाल होत आहेत. आजची परिस्थिती बघता अनेक ठिकाणी बेरोजगारीमुळे उपासमार व भूकमारी होत असल्याची चिन्हे आहेत. उपासमारीमुळे कोणाचा बळी जाऊ नये हा हेतूने पनवेलमधील पत्रकारांची सेवाभावी संस्था पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्याकडून ज्या ठिकाणी खरोखर उपासमार आहे व ज्याठिकाणी एका वेळचे अन्न देखील काही लोकांना मिळत नाही अशा गरजू ठिकाणी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.  पनवेल तालुक्यात अद्यापही अनेक अशा आदीवासी वाड्या, अनेक गरीब वस्ती आहेत जिथे अद्यापही मदत पोहचली नाही त्याठिकाणचा शोध घेऊन त्याठीकाणी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून करणार असल्याचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार आज पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील कोळवाडी यंतेहील आदिवासी वाडीवर गरीब - गरजू नागरिकांना तांदूळ, कांदा - बटाटे, तेल, डाळ व लसूण या जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती करणार जीवनाश्यक वस्तूंचे वाटप. दानशूर व्यक्तींना दान करण्याचे समितीतर्फे आवाहन

                                                              पनवेल / प्रतिनिधी : सध्या देशात कोरोना आजारामुळे सर्वत्र लाॅकडाऊन परिस्थिती आहे अशा परिस्थितीत कामगार वर्ग, कंत्राटी कामगार, हातावर पोट असलेले कामगार यांचे अतोनात हाल होत आहेत. आजची परिस्थिती बघता अनेक ठिकाणी बेरोजगारीमुळे उपासमार व भूकमारी होत असल्याची चिन्हे आहेत. उपासमारीमुळे कोणाचा बळी जाऊ नये हा हेतूने पनवेलमधील पत्रकारांची सेवाभावी संस्था पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्याकडून ज्या ठिकाणी खरोखर उपासमार आहे व ज्याठिकाणी एका वेळचे अन्न देखील काही लोकांना मिळत नाही अशा गरजू ठिकाणी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यात अद्यापही अनेक अशा आदीवासी वाड्या, अनेक गरीब वस्ती आहेत जिथे अद्यापही मदत पोहचली नाही त्याठिकाणचा शोध घेऊन त्याठीकाणी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप आम्ही संघर्ष समितीचे जेष्ठ सल्लागार माधवराव पाटील व सुनील पोतदार यांच्या मार्गदर्शनानुसार पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून करणार असल्याचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी सांगितले. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने जास्ती

जे.एम. म्हात्रे संस्थेकडून दोन हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू

  पनवेल प्रतिनिधी) : कोरोना  आजाराचा संसर्ग होऊ नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशात लाॅकडावून केले आहे महाराष्ट्रातली परिस्थिती दिवसागणिक पेशंट वाढत असल्याचे चित्र आहे अशातच अतिशय गांभीर्याने याकडे सरकार लक्ष घालत आहे याकरिता अधिकाधिक कठोर पावले सरकारकडून उचलली जात आहेत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने या  काळात अनेक व्यवसाय बंद आहेत. हातावर पोट असलेल्यांचे काम नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण  झाला आहे.   अशां कष्टकरी, कामगार, अल्प  उत्पन्न गटातील  कुटूंबियांना  जे.एम.म्हात्रे  संस्थेच्या  माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे  सुमारे 2000 कुटुंबांना एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जे. एम. म्हात्रे संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांनी दिली आहे. लाॅकडावून काळात श्रमिक, कामगार, हातावर पोट, असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप जे.एम. म्हात्रे संस्थेच्या  माध्यमातून करण्यात येणार असून या जीवनावश्यक वस्तू मध्ये पाच किलो तांदूळ,पाव किलो

खारघरसह पनवेल महानगरपालिकेमधील शिधापत्रिका नसणाऱ्या गरीब आणि गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लिना गरड यांनी केली

  खारघर / प्रतिनिधी : मागील एक महिन्यापासून मुंबई, नवी मुंबई , पनवेल परिसरातील उद्योगधंदे , कामधंदे आणि एकूणच लॉकडाऊनमुळे सर्वांची कामे गेलेली आहेत व अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा प्रकारचे उपासमारी व बेरोजगारी झालेले बरेच लोक खारघर तसेच पनवेल महापालिके मधील इतर परिसरामध्ये राहतात. यामध्ये बरेचसे कामगार , ड्रायव्हर, घरकाम करणाऱ्या महिला, हॉकर्स इत्यादी गरीब कुटुंब ,गावांमधील दहा बाय दहा चाळीमध्ये हे वास्तव्य करतात. खारघर सारख्या शहरामध्ये सुद्धा सेक्टर 12, घरकुल, वास्तुविहार , सेक्टर 3, 4, 21 इत्यादी ठिकाणी बरेचसे भाडेकरू 5000 रूपयांपेक्षा कमी भाडे देऊन आपल्या कुटुंबीयांसह राहात आहेत. यातील बऱ्याच जणांकडे शिधापत्रिका नाही किंवा ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न 60000 च्या पुढे आहे. आताच्या काळामध्ये लॉकडाऊन मुळे सर्वांची कामे गेलेली आहेत. *त्यामुळे शिधापत्रिका असो किंवा नसो खारघर व पनवेल महापालिका परिसरामधील अशा गरीब व व गरजू कुटुंबाला तीन महिन्याचे अन्नधान्य तात्काळ मोफत मिळावे किंवा कमी दरामध्ये उपलब्ध करून द्यावे* अशी मागणी पनवेल महानगर पालिकेच्या नग

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे गरजवंतांसाठी मदतीचा हात

      गरीब कुटुंबांना केले धान्य वाटप कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्या पासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात सुरक्षित राहणे हा एकमेव पर्याय आहे. लॉक डाऊन परिस्थितीमध्ये हातावर पोट असणाऱ्यांसाठी मात्र जगणे अत्यंत अवघड बनले आहे. लॉक डाऊन परिस्थितीमध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न  ज्यांच्या समोर निर्माण झाला आहे अशा लोकांच्या मदतीसाठी पनवेलची तालुका पत्रकार विकास मंच ही संस्था धावून गेली आहे. रसायनी विभागातील कष्टकरी नगर येथील गोरगरीब जनतेला पनवेल तालुका पत्रकार मंच या संस्थेच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. पार्श्व वूमन या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने धान्य वाटप करण्यात आले. याबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील म्हणाले की आज परिस्थिती फार बिकट बनली आहे. विषाणूचे संक्रमण आटोक्यात आणले नाही तर लॉक डाऊन चा कालावधी वाढू देखील शकतो. अशा परिस्थितीमध्ये गरीब जनतेचे  हाल होत आहेत. त्यांच्या मदती करता आम्ही आमचे खारीचे योगदान दिले आहे. अशाच प्रकार

इडलवाईज इंश्युरन्स कंपनीमुळे युवकाला मिळणार जीवनदान ! किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दिले २५ लाख !

मुकेश शिंदे पनवेल., "नवलोकहित दृष्टी " वृत्तसेवा : भारतातील अग्रणी विमा कंपनी म्हणून ओळ्खल्या जाणाऱ्या इडलवाईज टोकीयो लाईफ इंश्युरन्स कंपनीमुळे मुंबईतील दिनेश कोल्हे नामक युवकाला जीवनदान मिळणार आहे. इडलवाईज इंश्युरन्स कंपनीने या तरुणाला किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश तात्काळ अदा केला. कुठलीही इंश्युरन्स कंपनी आपल्या ग्राहकांना कशी सेवा परतावा व दावा देते यावर त्या कंपनीची विश्वासहर्ता तपासली व ओळखली जाते.पी .एल .लोखंडे मार्ग चेंबूर मुबंई येथे वास्तव्यास असलेल्या २६ वर्षीय दिनेश कोल्हे नावाच्या युवकाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तो रुग्ण डायलेसेसवर होता. डाँक्टरांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मध्यमवर्गीय असलेल्या कोल्हे कुटुंबावर उपचारासाठीच्या खर्चाचे मोठे आर्थिक संकट उभे राहिले. सुदैवाने दिनेश कोल्हे याने इडलवाईज कंपनीची इंश्युरन्स पॉलीसी खरेदी केली होती. त्यांचे वैयक्तिक सल्लागार रोशन शेट्टी यांनी सदर बाब कंपनीचे वरीष्ट डेव्हपलमेंट मॅनेजर शोभा पाटील -मोकाशी यांना कळविले. त्यांनी तात्काळ खारघर शाखा प्रकल्प सागर व

श्याम देवी माता ट्रस्ट व हाजी शनवाज खान फौंडेशन यांच्यावतिने कामठे पोलीस स्टेशन अन्नदान करण्यात आले

कोरोना या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे . अश्या या परीस्थित पोलीस बांधाव आपले कार्य करत आहे .पोलिसांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याने त्यांना  शाम देवी माता ट्रस्ट तसेच हाजी शनवाज खान फौंडेशन यांच्यावतिने कामठे पोलीस स्टेशन अन्नदान करण्यात आले . श्याम देवी माता ट्रस्ट तसेच हाजी शनवाज खान फौंडेशन हे गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी गोर गरीब लोकांना मदत करत आहे येणाऱ्या 14 तारखेपर्यंत असेच त्यांचे कार्य सुरू राहणार आहे अशी माहिती शनवाज खान फौंडेशन अध्यक्ष शनवाज खान यांनी दिली यावेळी सिधु कांबले (श्याम देवी ट्रस्ट) ,अकिल सय्यद(सुन्नी दावाटे ईस्लामी) ,शेनाझ खान(हिन्दु मुस्लीम एकता मंच) , विजय पाल(अध्याकस श्याम देवी माता ट्रस्ट) , धर्मेंद्र शर्मा , इरफान तांबोळी ( समाज सेवक ) , वसीम मस्ते ( समाज सेवक ) , दिलीप पाल , अनिल शुक्ला व कामोठे पोलीस कर्मचारी उपस्थित होते

मराठा समाज खारघरच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहाय्यता निधी साठी 1 लाख रुपयांचा धनादेश

खारघर : करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, दिवसेंदिवस मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा ओघ वाढला असून मराठा समाज खारघर यांच्या वतीने १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आला.       खारघर परिसरात मराठा समाजातील बांधवांनी एकत्र येऊन हि मदत केली असून पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांसोबतच उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले आणि उप आयुक्त जमीर लेंगरेकरयांच्याकडे मराठा समाज खारघर यांचे प्रतिनिधी हर्षल भदाणे पाटील यांनी हा धनादेश सुपूर्त केला. मराठा समाज, खारघरमधील या आधीही पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांसाठी असो वा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी, खारघरमधील मराठा समाजाने नेहमी एकत्र येऊन सढळ हाताने मदत केली असून, सार्वजनिक स्तरावर एकत्र येऊन सामाजिक ऐक्य आणि बांधिलकी जपण्याचा मराठा समाजाचे उद्धिष्ट असल्याचे मराठा समाज खारघरचे अध्यक्ष प्राचार्य बी. ए. पाटील यांनी सांगितले.       संस्थेचे कार्यध्यक्ष कालिद