Skip to main content

जागतिक महिला दिनानिमित्त राजे प्रतिष्ठान पनवेलतर्फे कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या) व भंगार व्यवसाय करणाऱ्या महिलांना साडी व गुलाब पुष्प वाटप

 


 



पनवेल / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राज्यातील सर्व स्तरातील व महिलांना नेहमी सन्मानाची वागणूक देत असत त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान पनवेल यांच्याकडून नेहमीच महाराजांना अभिप्रेत असे कार्य केले जात आहे. यावेळी महिला दिनानिमित्त देखील प्रमुख मार्गदर्शक जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, मुंबई संघटक चंद्रकांत धडके मामा यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेकडून पनवेलमधील कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या) व भंगार व्यवसाय करणाऱ्या महिलांना राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनानेनुसार साडी व गुलाबाचे फुल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि ८ मार्च २०२० रोजी जागतिक महिला दिनी भलेमोठे कार्यक्रम लाखो रुपये खर्च करून कार्यक्रम होतात यामध्ये राजकीय, सामाजिक, क्रीडा, न्याय, पत्रकारिता व इतर क्षेत्रातील सर्वच महिलांचा सत्कार होत असतो मात्र कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या), भंगार व्यवसाय करणाऱ्या, धुणी भांडी व घरकाम करणाऱ्या अशा महिलांचा सन्मान फार कमी होत असतो त्यामुळे आम्ही यावर्षी अशा महिलांचा सत्कार करून त्यांचे देखील समाजात मानाचे स्थान आहे हे निदर्शनास आणून दिले असे मत रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी व्यक्त केले. यावेळी राजे प्रतिष्ठानकडून महिलांना साडी व गुलाबपुष्प देण्यात आले.  दरम्यान केवल महाडिक यांच्या या कार्यक्रमाचे समस्त महिलावर्गाकडून कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमास रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, खारघर महिला अध्यक्षा ऍड. संतोषी चव्हाण, उपाध्यक्षा डॉ. सोनाली कलगुडे, खांदा कॉलनी अध्यक्ष किरण पालये, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, सचिव गंगाराम शिंदे, विजय पाबळे, राजू मोरे, सचिन गणेचारी, नितीन गणेचारी, विजय शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.