राजे प्रतिष्ठानतर्फे पनवेलमध्ये होळीच्या दिवशी एक पोळी गरिबांसाठी या उपक्रमांतर्गत गोर - गरिबांना पुरणपोळी वाटप
पनवेल / प्रतिनिधी : होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या व निराधार लोकांच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा तसेच आजच्या महागाईच्या दुनियेत प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी अशी संकल्पना राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांना सुचली न त्यानुसार गेली ३ वर्षापासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम त्यांच्यावतीने केले जाते. होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान पनवेलच्या वतीने यंदा पनवेल शहरामधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल, आसुडगाव या ठिकाणी असलेल्या गोर - गरिबांना व गरजूंना तसेच निराधार लोकांना पुरणपोळीचे वाटप केले जाणार आहे. होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असते तसेच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रम देखील होत असतात. मात्र या माध्यमातून अन्नाचा नास होते. तर दुसरीकडे अनेक गोर गरिबांना सणासुदीच्या दिवशीही उपाशीच झोपावे लागते. याची जाणीव ठेवून तसेच समाजातील प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी हा चांगल्या उद्देशाने राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार एक पोळी गरिबांसाठी हा उपक्रम येत्या ९ मार्च २०२० रोजी राबविण्यात येणार आहे. गेले २ वर्षे या उपक्रमास पनवेलकरांनी चांगला प्रतिसाद दिला अनेक मंडळे, सामाजिक संस्था, सोसायट्या यांनी आपल्या होळीमध्ये प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता ती आमच्याकडे दिली व आम्ही ती गरिबांपर्यंत पोहचवली त्यामुळे यावेळी देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असून ज्यांना कोणाला या उपक्रमास मदत करायची असेल त्यांनी *९३२०६४६५५५, ७४००११९७९७, ८३६९१९८३२८, ९०८२७४७७२३* या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी केले आहे.
Comments
Post a Comment