पनवेल(प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील गटांच्या नोंदी ३१ मार्चपर्यंत भूमी अभिलेखात करून देऊ, असे आश्वासन राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. डिस्कळ (ता.खटाव, जि.सातारा) येथील गट क्र.१३५५ च्या पुढील सर्व गटांच्या नोंदी भूमी अभिलेखात नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये निदर्शनास आले असून उप अधिक्षक भूमी अभिलेख, खटाव, मु.वडूज व उपसंचालक, भूमी अभिलेख यांच्या कार्यालयात सदर गटांच्या नोंदी घेण्याबाबत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित नागरिकांनी मागणी केली आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठा कालावधी होऊन सुद्धा नोंदणी न झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून येथील गटांच्या नोंदी तातडीने करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता.
या प्रश्नावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हंटले की, मौजे डिस्कळ ता. खटाव जि. सातारा या गावी दिनांक १६.०३.१९७२ रोजी जमीन एकत्रीकरण योजना मंजूर करण्यात येवून, मंजूर जमीन एकत्रीकरण योजनेचा अंमल घेणेत आला. त्यावेळी मौजे डिस्कळ गावास एकूण १ ते ३४२५ गट नंबर देणेत आले होते. दि. १५.५.१९७६ रोजी मौजे डिस्कळ गावाचे वाडी विभाजन होऊन मौजे गारवाडी, मौजे अनपटवाडी व मौजे चिंचणी ही नविन गावे मौजे डिस्कळ या मुळ गावातून वेगळी महसूली गावे तयार करण्यात आली. त्यानंतर दि.१४.१०.१९८५ रोजी मौजे डिस्कळ या गावातून मौजे काळेवाडी व मौजे पांढरवाडी ही दोन नविन महसूल गावे वेगळी करण्यात आली. त्यामुळे सदर वाडी विभाजनानंतर मुळ डिस्कळ या गावामध्ये आज रोजी आकारबंदानुसार १३५५ पर्यंत गट नंबर अस्तित्वात आहेत. तथापि, गट नंबर १३५५ चे पुढील गट नंबरांचा वाडी विभाजना पूर्वीचे गट नकाशात व आकारबंदास अंमल घेतला गेला नसलेमुळे सदरचे गट वाडी विभाजनाच्या आकारबंदामध्ये घेणेत आलेले नाहीत. या संदर्भात कुंडलिक विठ्ठल काटकर या व्यक्तिचा अर्ज उपसंचालक, भूमि अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांना प्राप्त झाला आहे. याबाबत कार्यवाही पूर्ण करून अहवाल सादर करणेबाबत जिल्हा अधीक्षक भमि अभिलेख, सातारा यांना उपसंचालक, भूमि अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी पत्रान्वये सूचना दिल्या आहेत, असे उत्तर ना.थोरात यांनी दिले होते. मात्र या प्रश्नाचे उत्तर मोघम असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात बोलताना, २०१७ साली हा आदेश देण्यात आला होता, तेव्हापासून यावर पुढील योग्य कार्यवाही झाली नाही, असे नमूद करून या संदर्भात तातडीने पाऊल उचलून गटांच्या नोंदी तातडीने करावी, अशी आग्रही मागणी केली. यावर बोलताना नामदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागाला आदेश देऊन ३१ मार्चपर्यंत गटांच्या नोंदी करण्याचे आश्वासन दिले आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment