लॉकडाऊनच्या काळात पनवेलमधील पत्रकारांना आर्थिक सहाय्य करा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पत्रकार केवल महाडिक यांची पत्राद्वारे मागणी.
पनवेल / प्रतिनिधी : संपूर्ण भारत देश १५ एप्रिल पर्यंत बंद म्हणजेच लॉकडाऊन करण्यात आला. यावरूनच आता कोरोनाचे संकट भारतीयांच्या उंबरठ्यावर दस्तक देत असल्याचे स्पष्ट चित्र आज दिसत आहे. राज्य सरकारचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान याना ही बाब समजली असेल, म्हणूनच अवघा भारत १५ एप्रिल प्रयन्त लॉकडाऊन करण्यात आल्याचे सूचक पाऊल उचलण्यात आले आहे. जर कोरोनाने भारताला विळखा घातला तर भारताला अनेकवर्ष याचा संघर्ष करावा लागेल. यासर्व परिस्थितीमध्ये सध्या महत्वाची भूमिका व आपला जीव धोक्यात घालून सर्व परिस्थिती व सत्य तमाम जनतेला दाखवणारे पत्रकार बंधू कसलीही तमा न बाळगता काम करीत आहेत. पनवेलमध्ये देखील पत्रकारांना विविध समस्या मग त्या लोकांची गर्दी करणे असो, चढ्या भावाने अन्नधान्य विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी असो सतत जनता संपर्कात असल्याने सर्व बातम्या दाखवण्यासाठी पत्रकारांना त्याठिकाणी जाऊन बातमी कारवाई लागते आपण लोकनेते म्हणून अनेकदा पत्रकारांना मायेचा हात व मदतीचा हात दिला आहे. एका पत्रकारावर अंदाजे ४ ते ५ सदस्यांचे अवलंबवून असते तरी आपण पत्रकारांसाठी देखील काही आर्थिक पॅकेजरूपी मदत करावी अशी विनंती सध्या अडचणीच्या काळामध्ये सर्व पत्रकारांच्या वतीने करीत आहोत आपण इतर वेळी ज्या प्रमाणे पत्रकारांना सांभाळून घेता, कोणी फिरायला जाणाऱ्या पत्रकारांच्या संस्था असतील त्यांनादेखील सढळ हस्ते मदत करता मात्र यावेळी खरी गरज पत्रकारांना तुमच्या मदतीची गरज आहे व आपण पनवेलमधील पत्रकारांना आर्थिक मदत करावी अशी मागणी कोकण संध्याचे मुख्य संपादक तथा पत्रकार केवल महाडिक यांनी रामशेठ ठाकूर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
Comments
Post a Comment