मुंबई विमानतळ येथे परप्रांतीयांना नोकर्या देत असाल तर थांबवा
मुंबई / प्रतिनिधी : राजे प्रतिष्ठान ( महाराष्ट्र राज्य) अखंड महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली संघटना आहे. ज्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील तमाम भूमिपुत्रांना आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता महाराजांच्या आशीर्वादाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेची स्थापना करण्यात आली आहे. मागील महिन्यात राजे प्रतिष्ठानचे शिष्टमंडळ आपल्या आस्थापनेत पार्किंग पावती ज्यावर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला होता, त्या संदर्भात आपणास पत्रक देण्याकरिता आले असता आमच्या शिष्टमंडळाच्या पदाधिकार्यांच्या लक्षात आले कि आपल्या आस्थापनेत काम करणारे सर्व कामगार हे महाराष्ट्राबाहेरील (परराज्यातील) असून त्यांना चांगल्या प्रकारे महाराष्ट्राची मातृभाषा मराठी व हिंदी बोलता येत नाही. तसेच विमानतळावर येणार्या- जाणार्या वाहन चालकांशी त्यांची वर्तवणूक चांगली नसून नेहमीच ते दादागिरीची भाषा करीत आहेत. एखादा महाराष्ट्राबाहेरील (परराज्यातील) व्यक्ती जर का भुमीपुत्रांना डावलत असेल तर असे कृत्य आमची संघटना कदापि सहन करणार नाही. आज स्थानिकांना डावलून मुंबई विमानतळ येथे परप्रांतीयांना नोकर्या देत असाल तर हे त्वरित थांबवावे तसेच मुंबई विमानतळाच्या सुरक्षेची बाब लक्षात घेता आज आपल्या आस्थापनेत काम करणार्या कामगारांचा चारित्र्य पडताळणीचा दाखला कायद्याने करणे बंधनकारक आहे, पण तसेही दिसून येत नाही हि बाब कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे असे मत सरचिटणीस चंद्रकांत धडके यांनी यावेळी एम. एस. ई. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक वीरेंद्र यादव यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडले. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडून याबाबत राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे एम. एस. ई. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सर्व प्रथम स्थानिकांना (भुमिपुत्रांना) नोकरीत प्राधान्य द्यावे, तसेच सद्यस्थितीत कार्यरत कामगारांना सौजन्याने वागण्यासहीतच त्यांचे चारित्र्य पडताळणी दाखला द्यावा अशा मागणीचे पत्र दिले आहे, तसेच त्यानंतर देखील एम. एस. ई. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासन जागे न झाल्यास त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राजे प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आला. या शिष्टमंडळात महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा, मंगेश लाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment