राजे प्रतिष्ठान पनवेल यांच्या दणक्याने छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी व सेंट विल्फ्रेड कॉलेजच्या जाहिरात पाट्या मराठी भाषेत
पनवेल / प्रतिनिधी : मराठी राज्य भाषेचा सन्मान करण्यासाठी शिक्षण संस्था, बँका, दुकाने आणि अस्थापनांमध्ये फलक मराठीत असले पाहिजे. महाराष्ट्रात मराठी राजभाषा असल्याचे घोषित करणारा कायदा विधानमंडळात मंजूर होऊन ११ जानेवारी १९६५ रोजी महाराष्ट्र राजपत्रातून जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात राहत असाल तर महाराष्ट्राच्या राजभाषेचा सन्मान व्हायलाच पाहिजे असे असतानाही रायगड जिल्ह्यातील पनवेल शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी व सेंट विल्फ्रेड कॉलेज जाहिरात पाट्या ह्या इंग्रजीत होत्या त्यानुसार रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या नेतृत्वात खांदा कॉलनी अध्यक्ष किरण पालये, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, सचिव गंगाराम शिंदे, विनोद पिंगळे, वैभव पाटील, सिद्धेश भालेकर, सचिन गणेचारी, नितीन गणेचारी, अनिकेत अंकुश, संजू कतोरिया, सोनू चव्हाण, अनिकेत मोरे, विजय पाबळे, अक्षय पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट घेऊन इथे राहायचे असेल तर मराठीत पाट्या पाहिजेत असे मुख्य कार्यकारी अधिकारी सोनी यांना सांगितले होते त्यानुसार या शिक्षण संस्थेने याठिकाणी इंग्रजीमध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातिचे फलक बदलून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव मराठीत टाकून पुन्हा जाहिराती प्रसिद्ध केल्या. मराठी या भाषेला दुय्यम स्थान देऊन जर का कोणी इथे व्यवसाय करीत असेल तर त्याची मस्ती उतरवली जाईल व राजे प्रतिष्ठान याबाबत आक्रमक भूमिका घेईल अशी माहिती यावेळी रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी दिली.
Comments
Post a Comment