Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

लॉकडाऊनच्या काळात पनवेलमधील पत्रकारांना आर्थिक सहाय्य करा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पत्रकार केवल महाडिक यांची पत्राद्वारे मागणी.           

                                                                              पनवेल / प्रतिनिधी : संपूर्ण भारत देश १५ एप्रिल पर्यंत बंद म्हणजेच लॉकडाऊन करण्यात आला. यावरूनच आता कोरोनाचे संकट भारतीयांच्या उंबरठ्यावर दस्तक देत असल्याचे स्पष्ट चित्र आज दिसत आहे. राज्य सरकारचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान याना ही बाब समजली असेल, म्हणूनच अवघा भारत १५ एप्रिल प्रयन्त लॉकडाऊन करण्यात आल्याचे सूचक पाऊल  उचलण्यात आले आहे. जर कोरोनाने भारताला विळखा घातला तर भारताला अनेकवर्ष याचा संघर्ष करावा लागेल. यासर्व परिस्थितीमध्ये सध्या महत्वाची भूमिका व आपला जीव धोक्यात घालून सर्व परिस्थिती व सत्य तमाम जनतेला दाखवणारे पत्रकार बंधू कसलीही तमा न बाळगता काम करीत आहेत. पनवेलमध्ये देखील पत्रकारांना विविध समस्या मग त्या लोकांची गर्दी करणे असो, चढ्या भावाने अन्नधान्य विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी असो सतत जनता संपर्कात असल्याने सर्व  बातम्या दाखवण्यासाठी पत्रकारांना त्याठिकाणी जाऊन बातमी कारवाई लागते आपण लोकनेते म्हणून अनेकदा पत्रकारांना मायेचा हात व मदतीचा हात दिला आहे. एका पत्रकारावर अंदाजे ४ ते

राजे प्रतिष्ठान भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणार

मुंबई विमानतळ येथे परप्रांतीयांना नोकर्‍या देत असाल तर थांबवा मुंबई / प्रतिनिधी : राजे प्रतिष्ठान ( महाराष्ट्र  राज्य) अखंड महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली संघटना आहे. ज्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आहेत. याचाच एक भाग म्हणून  महाराष्ट्रातील तमाम भूमिपुत्रांना आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता महाराजांच्या आशीर्वादाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेची स्थापना करण्यात आली आहे. मागील महिन्यात राजे प्रतिष्ठानचे शिष्टमंडळ आपल्या आस्थापनेत पार्किंग पावती ज्यावर अखंड  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला होता, त्या संदर्भात आपणास पत्रक देण्याकरिता आले असता आमच्या शिष्टमंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या लक्षात आले कि आपल्या आस्थापनेत काम करणारे सर्व कामगार हे  महाराष्ट्राबाहेरील (परराज्यातील) असून त्यांना चांगल्या प्रकारे  महाराष्ट्राची मातृभाषा मराठी व हिंदी बोलता येत नाही. तसेच विमानतळावर येणार्‍या- जाणार्‍या वाहन चालकांशी त्यांची वर्तवणूक चांगली नसून नेहमीच ते दादागिरीची भाषा करीत आहेत. एखादा  महाराष्ट्राबा

जागतिक महिला दिनानिमित्त राजे प्रतिष्ठान पनवेलतर्फे कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या) व भंगार व्यवसाय करणाऱ्या महिलांना साडी व गुलाब पुष्प वाटप

    पनवेल / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राज्यातील सर्व स्तरातील व महिलांना नेहमी सन्मानाची वागणूक देत असत त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान पनवेल यांच्याकडून नेहमीच महाराजांना अभिप्रेत असे कार्य केले जात आहे. यावेळी महिला दिनानिमित्त देखील प्रमुख मार्गदर्शक जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, मुंबई संघटक चंद्रकांत धडके मामा यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेकडून पनवेलमधील कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या) व भंगार व्यवसाय करणाऱ्या महिलांना राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनानेनुसार साडी व गुलाबाचे फुल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि ८ मार्च २०२० रोजी जागतिक महिला दिनी भलेमोठे कार्यक्रम लाखो रुपये खर्च करून कार्यक्रम होतात यामध्ये राजकीय, सामाजिक, क्रीडा, न्याय, पत्रकारिता व इतर क्षेत्रातील सर्वच महिलांचा सत्कार होत असतो मात्र कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या), भं

राजे प्रतिष्ठान पनवेल यांच्या दणक्याने छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी व सेंट विल्फ्रेड कॉलेजच्या जाहिरात पाट्या मराठी भाषेत

पनवेल / प्रतिनिधी : मराठी राज्य भाषेचा सन्मान करण्यासाठी शिक्षण संस्था, बँका, दुकाने आणि अस्थापनांमध्ये फलक मराठीत असले पाहिजे.  महाराष्ट्रात मराठी राजभाषा असल्याचे घोषित करणारा कायदा विधानमंडळात मंजूर होऊन ११ जानेवारी १९६५ रोजी महाराष्ट्र राजपत्रातून जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात राहत असाल तर महाराष्ट्राच्या राजभाषेचा सन्मान व्हायलाच पाहिजे असे असतानाही रायगड जिल्ह्यातील पनवेल शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी व सेंट विल्फ्रेड कॉलेज जाहिरात पाट्या ह्या इंग्रजीत होत्या त्यानुसार रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या नेतृत्वात खांदा कॉलनी अध्यक्ष किरण पालये, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, सचिव गंगाराम शिंदे, विनोद पिंगळे, वैभव पाटील, सिद्धेश भालेकर, सचिन गणेचारी, नितीन गणेचारी, अनिकेत अंकुश, संजू कतोरिया, सोनू चव्हाण, अनिकेत मोरे, विजय पाबळे, अक्षय पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट घेऊन इथे राहायचे असेल तर मराठीत पाट्या पाहिजेत असे मुख्य कार्यकारी अधिकारी सोनी यांना सांगितले होते त्यानुसार या शिक्षण संस्थेने याठिकाणी इंग्रजीमध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातिचे फलक बदलू

राजे प्रतिष्ठानतर्फे पनवेलमध्ये होळीच्या दिवशी एक पोळी गरिबांसाठी या उपक्रमांतर्गत गोर - गरिबांना पुरणपोळी वाटप

  पनवेल / प्रतिनिधी : होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या व निराधार लोकांच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा तसेच आजच्या महागाईच्या दुनियेत प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी अशी संकल्पना राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांना सुचली न त्यानुसार गेली ३ वर्षापासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम त्यांच्यावतीने केले जाते. होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान पनवेलच्या वतीने यंदा पनवेल शहरामधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल, आसुडगाव या ठिकाणी असलेल्या गोर - गरिबांना व गरजूंना तसेच निराधार लोकांना पुरणपोळीचे वाटप केले जाणार आहे. होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असते तसेच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रम देखील होत असतात. मात्र या माध्यमातून अन्नाचा नास होते. तर दुसरीकडे अनेक गोर गरिबांना सणासुदीच्या दिवशीही उपाशीच झोपावे लागते. याची जाणीव ठेवून तसेच समाजातील प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपो

विधिमंडळात आमदार प्रशांत ठाकूर यांची गट नोंदणीची मागणी  

पनवेल(प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील गटांच्या नोंदी ३१ मार्चपर्यंत भूमी अभिलेखात करून देऊ, असे आश्वासन राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिले.          आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. डिस्कळ (ता.खटाव, जि.सातारा) येथील गट क्र.१३५५ च्या पुढील सर्व गटांच्या नोंदी भूमी अभिलेखात नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये निदर्शनास आले असून उप अधिक्षक भूमी अभिलेख, खटाव, मु.वडूज व उपसंचालक, भूमी अभिलेख यांच्या कार्यालयात सदर गटांच्या नोंदी घेण्याबाबत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित नागरिकांनी मागणी केली आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठा कालावधी होऊन सुद्धा नोंदणी न झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून येथील गटांच्या नोंदी तातडीने करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी

जागतिक महिला दिनानिमित्त राजे प्रतिष्ठान पनवेलतर्फे कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या) व भंगार व्यवसाय करणाऱ्या महिलांना साडी वाटप करून करणार सन्मानित 

पनवेल / प्रतिनिधी : महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. यावेळी देखील ८ मार्च २०२० रोजी छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष अ