पनवेल : सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, राजकीय, साहित्य व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा युथ फोरम सोशियल असोसिएशन यांच्या वतीने पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने देवीचापाडा याठिकाणी आयडियल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न नुकताच संपन्न झाला.
यूथ फोरम सोशियल असोसिएशन यांच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात. समाजातील वंचित व दुर्बल घटकासाठी निस्वार्थपणे काम करणारी अनेक लोक आहेत. समाजासाठीच त्यांचे योगदान अतिशय मोलाचे व महत्त्वाचे आहे. या सामाजिक बांधिलकी म्हणून या मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी आपण हा सोहळा आयोजित करत असतो, अशी माहिती यावेळी संस्थेचे अध्यक्ष केवल गायकवाड यांनी यावेळी दिली.
पुरस्काराने सन्मानित आलेल्या गुणवंताची नावे:
पत्रकारिता: मयूर तांबडे, केवल महाडिक, गणपत वारगडा
सामाजिक क्षेत्र: डि. के. भोपी, नरेंद्र भोपी, विजय कदम, सलमान गांगू, प्रशांत जाधव
शैक्षणिक: यशवंत बिडे, किशोर पाटील, संदीप काठे
राजकीय: विजय पवार
समालोचन: रोशन पाटील
क्रिडा: अजित गवते (क्रिकेट), साजन पावशे(कुस्ती), अवंती जाधव(कुडो) कला : कौस्तुभ भाग्यवंत (तबला), चिन्मय साखरे (नृत्य)
पर्यावरण : योगेश पगडे
संस्था: नेचर फ्रेंड सोसायटी, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, मॉडर्न योगी इन्स्टिटूट
(फोटो : पुरस्कार स्वीकारताना पत्रकार मयूर तांबडे
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment