Skip to main content

साडे बारा टक्के योजनेतील वाटप प्रक्रिया न झालेल्या  इरादित भूखंडांबाबत सिडकोतर्फे सुनावणी

 


नवी मुबई : सिडकोच्या नवी मुंबई अधिसूचित क्षेत्रात रायगड जिल्ह्याच्या उरण व पनवेल तालुक्यांतील ज्या प्रकल्पबांधितांना साडे बारा टक्के (12.5%) योजने अंतर्गत भूखंड इरादित करण्यात येऊनही त्यांनी वाटपपूर्व प्रक्रिया आजतागायत पूर्ण केलेली नाही, अशा भूखंडधारकांना याबाबत आपले म्हणणे मांडण्याकरिता दि. 2 मार्च ते 20 मार्च, 2020 या कालावधीत नोडनिहाय सुनावणीचे आयोजन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. या कालावधीत संबंधित भूधारकांनी आपल्या नोडनुसार दिलेल्या तारखेस सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - 400 614  येथील सातव्या मजल्यावरी साडे बारा टक्के विभाग कार्यालय अथवा तळ मजल्यावरील समस्या निवारण केंद्र येथे उपस्थित राहून आपला खुलासा सादर करावा.


सिडकोच्या नवी मुंबई प्रकल्पा अंतर्गत उरण व पनवेल तालुक्यांतील जी गावे नवी मुंबई अधिसूचित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली होती, अशा गावांतील प्रकल्पबाधित खातेदारांना भूसंपादनापोटी साडे बारा टक्के योजने अंतर्गत भूखंड इरादित करण्यात आले होते. सदर भूखंड इरादित होऊन सुमारे 3 ते 10 वर्षांचा कालावधी लोटला असून अद्यापही काही प्रकल्पबाधितांनी इरादित भूखंडासंबंधी भूखंड वाटपाबाबतची पुढील कार्यवाही केली नसल्याचे सिडकोच्या अभिलेखावरून (रेकॉर्ड) निदर्शनास आले आहे. सर्व नोडमधील अशा भूखंडांची यादी दि. 23 जानेवारी, 2020 रोजी सिडकोच्या https://cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती व याबाबतची सूचनाही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. 


सदर इरादित भूखंडांपैकी पायाभूत सुविधा नसल्यामुळे संबंधित भूखंडधारकांनी वाटपपूर्व प्रक्रिया केलेली नाही, अशा भूखंडांचा नंतर विचार करण्यात येईल. तथापि या व्यतिरिक्त जे भूखंड इरादित होऊन बराच कालावधी लोटलेला आहे अशा भूखंडधारकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन, भूखंड रद्द करून नवीन पात्र प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. संबंधित भूखंडधारकांना याबाबत वेळीच कळावे याकरिता वैयक्तिक नोटिसा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परंतु वाढते शहरीकरण, प्रकल्पबाधितांचे जुने पत्ते किंवा स्थलांतर यांमुळे वैयक्तिक नोटीसा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत तरी उपरोक्त संकेतस्थळांवर 18 फेब्रुवारी, 2020 रोजी नोडनिहाय भूखंडांच्या सुधारित याद्या, त्याबाबतची जाहीर सूचना व नोडनिहाय सुनावणीच्या तारखा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्या भूधारकांच्या सोयीसाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यालये, पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 29 गावांच्या याद्या खारघर, कळंबोली व कामोठे येथील महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये तसेच सिडकोच्या साडे बारा टक्के विभागातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 


वाटप प्रक्रिया न झालेल्या नोडनिहाय भूखंडांचा तपशील पुढीलप्रमाणे :- कळंबोली-4, आसुडगांव-9, तळोजा-93, रोडपाली-70, नावडे-37, करंजाडे-60, काळुंद्रे-26, खारघर-12, कामोठे-I-13, कामोठे-II-11, द्रोणागिरी-268, उलवे-227, एकूण-830.    


नोडनिहाय सुनावणीच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत :- कळंबोली/आसुडगांव/द्रोणागिरी - 2 व 3 मार्च 2020, तळोजा/द्रोणागिरी/करंजाडे व काळुंद्रे - 5 व 6 मार्च 2020, खारघर/द्रोणागिरी/रोडपाली - 11 व 12 मार्च 2020, कामोठे-1/द्रोणागिरी/उलवे - 16 व 17 मार्च 2020, कामोठे-2/उलवे/नावडे - 19 व 20 मार्च 2020.   


संबंधित भूधारकांनी आपल्या नोडनिहाय दिलेल्या तारखांना उपस्थित राहून भूखंडाबाबतचे न्यायालयीन प्रकरण, घरगुती वाद इ. बाबत आपला खुलासा व्यक्तिश: अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यामार्फत किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तिमार्फत लेखी स्वरूपात द्यावा. लेखी खुलासा सादर करताना भूधारकांनी त्यांचा संचिका क्रमांक, यादीतील नोटीस क्रमांक, मोबाइल क्रमांक इ. माहितीही नमूद करावी. या सुनावणीकरिता संबंधित भूधारकांनी सिडकोच्या उपरोक्त कार्यालयात उपस्थित राहून आपला खुलासा सादर करावा.  हा खुलासा समाधानकारक नसल्यास भूखंड रद्द करण्याची पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची संबंधित भूधारकांनी नोंद घ्यावी.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.