Skip to main content

मराठी भाषादिनाचे औचित्य साधुन कोंकण भवन  येथे कार्यशाळेचे आयोजन संपन्न 



  नवी मुंबई : दि. २६ रोजी  माहितीच्या क्षेत्रात सतत बदल होत आहेत. आजच्या युगात कॅमेरा नष्ट होत असुन मोबाईल युग सुरु झाले आहे . ही  एक नवीन क्रांती असुन या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामकाजात करुन माहिती विभागाने अद्ययावत व्हावे असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
    कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने  कोकण भवन येथे मराठी भाषादिनाचे औचित्य साधुन आयोजित मोबाईल पत्रकारिता या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपसंचालक डॉ गणेश मुळे, ज्येष्ठ पत्रकार सुनिल ढेपे, वरिष्ठ पत्रकार हर्षल भदाणे उपस्थित होते. 
     यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ पांढरपट्टे म्हणाले काळाची पाउले ओळखुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामकाजात  वापर करीत आहे. सध्याचे मोबाईलचे युग आहे. मोबाईल पत्रकारितेचे महत्त्व लक्षात घेऊन  कोकण विभागीय कार्यालयाने यासाठी घेतलेला पुढाकार  अतिशय अभिमानास्पद आहे.
      मोबाईल हा माहिती विभागाचा साथी बनला आहे. जिल्हास्तरावर अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात यावे. आगामी काळात माहिती महासंचालनालय आधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री पांढरपट्टे यांनी यावेळी केले.
    उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनी प्रास्तविकामध्ये कार्यशाळा आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. मोबाईल पत्रकारीतेचा वापर कसा करायचा,  त्याचे फायदे आहे आणि भविष्यात 'मोजो' किती गरजेचा आहे याबाबत माहिती दिली.
      मोबाईल पत्रकारिता या  विषयावर  मार्गदर्शन करताना वरिष्ठ पत्रकार, हर्षल भदाणे यांनी   विविध मोबाईल अँपची माहिती देऊन प्रशिक्षण दिले. तसेच उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिक करुन घेतले. 
     पुणे येथील जेष्ठ पत्रकार सुनील ढेपे, यांनी डिजिटल मीडिया आणि नवे बदल या विषयावर मार्गदर्शन केले. संगणकात मराठीचा वापर याविषया वर विभागीय सचिव जयंत भगत आणि नटराज कटकधोंड यांनी मार्गदर्शन केले. जागतिकरणाच्या जमान्यात संगणकाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या वापराबाबत अनेक अॕपच्या वापराबाबत माहिती दिली.  
     या कार्यशाळेस सहसंचालक लेखा कोषागारे सिताराम काळे, आरोग्य अधिकारी डॉ गणेश धुमाळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सुत्रसंचलन जिल्हा माहिती अधिकारी ठाणे  मनिषा पिंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन माहिती अधिकारी राहुल भालेराव यांनी केले. कार्यशाळेस कोकण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.