Skip to main content

पंजाबराव देशमुख विद्यापीठात २१ विदेशी विद्यार्थ्यांचे कृषी शिक्षण धडे 

विदर्भातील संपूर्ण ११ जिल्हय़ांचे कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २१ विदेशी विद्यार्थी कृषी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण करणाऱ्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधून गत ५० वर्षांत ४८ हजार कृषी पदवीधर तयार झाले आहेत. कृषी शिक्षण, संशोधन व विस्तारात विद्यापीठाचे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.


विदर्भाला शेतीची समृद्ध परंपरा लाभली आहे. परंतु गत दोन दशकापासून शेतकरी आत्महत्यांची काळी छाया विदर्भातील कृषी क्षेत्रावर पडली आहे. या परिस्थितीतही  कृषी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचा कल सातत्याने वाढत आहे.  २० ऑक्टोबर १९६९ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठांतर्गत १० घटक महाविद्यालये, दोन संलग्न महाविद्यालये व २६ कायम विना अनुदानीत खासगी कृषी महाविद्यालये असून या मार्फत दरवर्षी एकूण ३६६१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी ३१९५, पदव्युत्तर अभ्याक्रमाच्या ४१० व आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या ५६ जागांचा समावेश आहे.


‘इंडो-अफगाण, इंडो-अफ्रिका व इंडिया-नेपाळ शिष्यवृत्ती मदत निधी’ या नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत प्रकल्पांतर्गत अफगाणिस्तान, नेपाळ, इथियोपीया, नायजेरीया, युगांडा, इजिप्त, व्हिएतनाम व भुतान या देशांमधील २१ विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासून आतापर्यंत ४८१९० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये ३७८८३ पदवीधर, ९५९७ पदव्युत्तर व ७१० आचार्य पदवीधर समाविष्ट आहेत.


नव्यानेच दोन महाविद्यालयांची स्थापना


विदर्भासाठी नव्यानेच दोन महाविद्यालये मंजूर झाली आहेत. त्यामध्ये ४० विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेले यवतमाळ येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आणि ६० विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेले चंद्रपूर जिल्ह्यतील मुल मारोडा येथे कृषी महाविद्यालय आहे.


कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार कृषी शिक्षण देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांनाही कृषी शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.


– डॉ. विलास भाले, कुलगुरू.


 


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.