Skip to main content

पत्रकाराला मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित पत्रकारांच्या एकजुटीचा विजय


मुंबई :पत्रकारांच्या एकजुटीचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. मिडेचे वरिष्ठ छायाचित्रकार एका आंदोलनाचे   छायांकन  करीत असताना पोलिसांनी त्यांना मारहाण केली होती.. मराठी पत्रकार परिषदेसह मुंबईतील व  पत्रकार संघटनांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.. तयानुसार नागपाडा पोलीस ठाण्याचे एपीआय बोरसे यांना चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचे तर दुसरे अधिकारी शेख यांचा प्रोबेशन कालावधी वाढविणयाचा आदेश गृहमंत्र्यांनी दिला आहे.. पत्रकार संघटनांच्या एकजुटीचा हा विजय मानला जात आहे..
"मिड डे" चे वरिष्ठ छायाचित्रकार  आशीष राजे यांच्यावर गुरूवार  दिनांक ६ फेब्रुवारी रोजी  पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणी आज गृहमंत्री अनिल  देशमुख यांच्या  सोबत झालेल्या पत्रकार संघटनांच्या बैठकीत राजे   मारहाण  प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी बोरसे (एपीआय) यांची चौकशी होईपर्यंत निलंबित तर दुसरे पोलिस अधिकारी शेख (पीएस आय) यांचा प्रोबेशन कार्यकाळ वाढविला जाईल असा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला सहपोलीस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते.


राजकीय मोर्चे, आंदोलने किंवा कोणत्याही दुर्घटनेप्रसंगी पोलिसांनी पत्रकारांशी सौजन्याने वागावे असे परिपत्रक  पोलीस आयुक्तांनी काढले आहे.त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व अधिक्षकांनी करावी अशा सुचना त्वरित दिल्या जातील.  तसेच साकीनाका आग प्रकरणी वाहतूक विभागाच्या  एसीपी अस्मिता भोसले व बांद्रा    मातोश्री येथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केल्या    प्रकरणी खेरवाड़ी पोलिसांना योग्य ती समज दिली जाईल असाही निर्णय घेतला गेला.टी व्ही जर्नालिस्ट एसोसिएशन,मराठी पत्रकार परिषद,बाॅम्बे फोटोग्राफर असोसिएशन, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ,  या पत्रकार संघटनानी अधिकार्यांच्या निलंबनाची  मागणी लावून धरली ती गृहमंत्र्यांनी  मान्य कली


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.