Skip to main content

आरटीईसाठी २०२० ते २०२१ प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू





मुंबई  : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर पात्रताधारक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी आज ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रिया चालणार असून, या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ मार्च ते ३ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करून संधी मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.  आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या शाळांना स्वयंचलितरीत्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया दि.२१ जानेवारीपासून सुरू झाली असून, सोबतच गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून नवीन नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणीही सुरू झाली आहे. ही पडताळणी प्रक्रिया ६ फेब्रुवारीर्यंत चालणार असून, त्यानंतर ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी व १६ मार्च ते ३ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करून संधी मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. दरम्यान, लॉटरीतून संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर प्रतीक्षा यादीनुसार चार टप्प्यांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. यातील पहिला टप्पा १३ ते १८ एप्रिल असा पाच दिवसांचा, दुसरा टप्पा २४ ते २९ फेब्रुवारी, तिसरी यादी ६ ते १२ मे व चौथी यादी १८ ते २२ मे या कालावधीत राबविली जाणार असून, प्रत्येक टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पाच दिवसांचा कालावधी मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

एकच लॉटरी
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या  प्रवेशप्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून, यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत केवळ एकच लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी संधी मिळालेल्या पालकांना दिलेल्या मुदतीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश निश्चित करणे अनिवार्य असून, निश्चित मुदतीनंतर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी चार टप्प्यात प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.  


संपादक : संदेश सोनमळे 


मोबाईल : ९७६८११२३३७


ईमेल : navlokhitdrushti2014@gmail.com 


बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा 


वेब पेजवर बातम्याशी संपादक सहमत असतीलच असे नाही 






Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.