उरण - जेएनपीटी वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या विजेच्या दरात अन्यायकारक भरमसाठ वाढ केली. यापूर्वी हे दर वसाहतीत असणाऱ्या इमारतीच्या वर्गीकरणाप्रमाणे निश्चित केले होते. परंतु नवीन परिपत्रकाप्रमाणे कामगारांच्या मुळचेतनाशी ते जोडले आहेत. हे दर अवाजवी तर आहेतच पण त्यामुळे समान वीज यूनिट वापरणाऱ्या पण वेगळे मूळवेतन असणाऱ्या दोन कामगारांना वीजबिलाची रक्कम वेगळी असणार आहे. प्रशासनाची ही कृती बेकायदेशीर आहे जेएनपीटी वर्कर्स युनियनने या संदर्भात मुख्य सचिव (प्रशासन) यांची आज ( दि.१३) त्यांच्या दालनात भेट घेवून प्रशासनाची ही कृती बेकायदेशीर आहे हे पटवून देवून सदर परिपत्रक त्वरित रद्द करण्याची मागणी केली व सर्व
मान्यताप्राप्त कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर यासबधी निर्णय घेण्याची जोरदार मागणी केली.
तसेच हे परिपत्रक वेतन कराराचे भंग करणारे असल्याचे ठणकावून सांगितले. वसाहतीत राहणाऱ्या कर्मचान्यांना घरभाडे भत्याच्या बदल्यात मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेवून त्यात समाधानकारक बदल होई पर्यंत कोणतीही प्रस्तावित दरवाढ लागू न करण्याचीही जोरदार मागणी युनियन तर्फे केली. मुख्य सचिव (प्रशासन) यांनी जेएनपीटी वर्कर्स युनियन मागणी मान्य केली असून चर्चेअंती निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रसंगी जेएनपीटी मा.कामगार विश्वस्त व वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी श्री रवी पाटील, भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रकाश नाचरे, मनोज घरत, प्रमोद पाटील, श्री जनार्दन बंडा, सूर्यकांत गायकवाड तसेच जेएनपीटी वर्कर्स युनियन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment