Skip to main content

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार १७ फेब्रुवारी या तारखेला शुभारंभाचा मुहूर्त

 


मांडवा ते भाऊचा धक्का रो-रो सेवा १७      फेब्रुवारीला  होणार


अलिबाग : अलिबागकरांना प्रतीक्षा असलेली रो-रो मुंबई बंदरात दाखल झाली असून येत्या १७ फेबु्रवारी शिवजयंतीच्यानिमित्ताने ही सेवा सुरु होणार आहे. याबाबत अधिकृत माहिती सरकारने दिलेली नसली तरी सूत्रांनुसार राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते रो-रो सेवेचे उद्घाटनाचा करण्यात येणार आहे.


मांडवा ते भाऊचा धक्का अशी रो-रो सेवा सुरु होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर सर्वांचेच लक्ष या बोटीकडे होती. मोठ्या प्रतिक्षेनंतर ही रो-रो बोट ग्रीसमधून भारतात दाखल झाली आहे. ‘प्रोटो पोरोस एक्स व्ही’ असे या बोटीचे नाव आहे. या बोटीची चाचणी तसेच अन्य तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान रो-रो बोट सेवा सुरू होणार आहे. ही सेवा सुरु झाल्यानंतर या बोटीमधून बस कार, बाईक, अन्य वाहने केवळ तासाभरातच अलिबाग गाठता येणार आहे. प्रवाशांसह पर्यटकांची मोठी सोय होणार असून रायगडच्या पर्यटन व्यवसायाला खर्‍या अर्थाने चालना मिळेल, अशी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.


२०१६ साली प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली. १३५ कोटींच्या या प्रकल्पाचा ठेका डीव्हीपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आला. प्रवासी तळ, जेट्टी, ब्रेक वॉटर, टर्मिनल ही प्राथमिक कामे पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रो-रो बोटसेवा सुरू होणे अपेक्षित होते, पण बोट आणण्यामध्ये काही अडचण निर्माण झाली. आता नवा करार करून बोट सेवा सुरु होणार आहे.


रो-रो बोटीमधून ५० वाहने नेण्याची क्षमता असून दीडशे ते दोनशे प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. या बोटीमुळे रोजगार तर वाढेलच, पण मुंबई ते अलिबाग हे अंतर कमी होणार असल्याने त्याचा मोठा फायदा पर्यटन वाढीला होणार आहे. भाऊचा धक्का ते अलिबागमधील मांडवा हे १२५ किलोमीटरचे अंतर रस्त्याने गाठण्यासाठी सध्या तीन ते चार तासांचा वेळ लागतो. मात्र रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर केवळ एका तासातच निसर्गरम्य मांडवा गाठता येणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा या प्रवासासाठी साधारणतः एका वाहनासाठी सहाशे ते आठशे रुपये इतके तिकीट आकारण्यात येणार आहे. वाहनाचा प्रकार पाहून कमी अधिक रक्कम होऊ शकेल.



Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.