बँकिंग सोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन पनवेल शाखेने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. सर्व प्रथम बँकेचे सन्माननीय ग्राहक व डी.एस.ए. मा. प्रदीपराव देशमुख यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले व सर्व उपस्थितांनी दोन्ही महामानवास पुष्प अर्पण करून मानाचा मुजरा केला. यावेळी बँकेचे शाखा प्रबंधक, मा. विजयकुमार पाटील, प्रबंधक, मा. सौ. शैलजा ठाकेकर, विशेष सहायक, अरविंद मोरे व दफ्तरी वामनराव गायकवाड उपस्थित होते.
या प्रसंगी बँकेचे विशेष सहायक, मा. अरविंद मोरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण केले की, प्रत्येकाच्या अंगात उत्साह व नव चैतन्य संचारते. हे केवळ छत्रपतींच्या अंगी असलेल्या अष्टपैलू गुणामुळे व कर्तृत्व मुळेच. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. तसेच ते सर्वांचे उद्धारकर्ता सुद्धा होते. ते महिलांचा सन्मान करणारे होते. कोणी महिलांचा अपमान केला तर ते कठोर शासन करणारे होते आणि म्हणून त्या काळात महिलांवर अत्याचार होत नसत. छत्रपती शिवाजी महाराज हे पर्यावरण रक्षक होते. ते ह्या मताचे होते ते की किल्यांच्या रक्षना साठी जसे सैनिक मावळे गरजेचे आहेत तेव्हढेच वृक्ष सुद्धा किल्याच्या व वातावरण्याच्या समतोलासाठी आवश्यक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्याचे सुद्धा विशेष काळजी घेणारे होते. लढाईच्या वेळेस शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची दक्षता घेत व आपल्या सैनिकांना वेळोवेळी सूचना देत. अश्या या अष्टपैलू व्यतिमत्व असलेल्या छत्रपतींना स्मरण करून त्यांच्या गुणांचे अनुकरण करणे फार गरचेचे असून ते सर्वांनी अवलंबिणे ही काळाची गरज आहे.
या प्रसंगी बँकेचे सन्माननीय ग्राहक रणजित चव्हाण, स्वराज पाटील, दत्तात्रय ननावरे, अरबाज, यशवंते, गुरुनाथ ननावरे व इतर सन्मानणीय ग्राहक उपस्थित होते.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment