उत्तरप्रदेश : एका तरुणीवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार बरेलीमध्ये समोर आला आहे. ज्यावेळी तरुणीचे लग्न झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ तिच्या पतीला पाठवल्याने हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पीडितेच्या पतीने तिला घरातून हाकलून दिले आहे.
लग्नाच्या काही दिवस अगोदर पीडित तरूणी तिच्या मैत्रीणीच्या घरी गेली होती. त्यावेळी मैत्रिणीच्या भावाने चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा व्हिडिओ देखील बनवला. पीडितेचे लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ आला. तो बघताच संतप्त पतीने तिला घरातून हाकलून दिले. पतीने घरातून काढल्यानंतर पीडितेने सिरोली पालीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली, मात्र तेथील अधिकाऱ्याने आरोपीला अशांतता पसरवल्याच्या आरोपाखाली दंडात्मक कारवाईकरून त्याला सोडून दिले. त्यामुळे पीडितेने याची तक्रार पोलीस अधिक्षक मुनिराज यांच्याकडे केली. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत, अधीक्षकांनी चौकशी करून सरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सोम प्रकाश यांना तडकाफडकी निलंबीत केले. तसेच आरोपी विरोधात बलात्कार आणि आय टी अॅक्टनूसार गुन्हा देखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment