राजे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील विहिघर गावामध्ये दिनांक २० फेब्रुवारी २०२० रोजी क्रिकेटच्या नाईट मॅचेस दरम्यान भाजपाचा नेता पंढरीनाथ फडके यांच्या रॉयल एंट्रीला त्यांनी स्वतः पोलिसांच्या मते नकली मात्र आमच्या मते खऱ्या बंदुकीने यूपी बिहार स्टाईलने गोळ्या झाडल्या. आपण किती मोठे गुंड आहोत व कायदा आपले काहीही करू शकणार नाही हे मनात ठासून अशा प्रकारची कृत्य पंढरीनाथ फडके याने केली आहेत. अशा प्रकारच्या माणसाचा फक्त गावालाच नव्हे तर तालुक्याला व जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत आम्ही खांदेश्वर पोलीस ठाण्याशी माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी चौकशी होण्याच्या आधीच सदर बंदूक हि नकली असल्याचे सांगितले त्यानंतर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालयातील मध्यवर्ती गुन्हे शाखा कक्ष २ यांच्याकडे तपास सुपूर्द करून पंढरीनाथ फडके यास ताब्यात घेतले असल्याचे समजले. मात्र खांदेश्वर पोलिसांची भूमिका याबाबतीत संशयास्पद असल्याचे दिसून येते यामुळे येथे कडक शिस्तीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणे गरजेचे असून अशा गुंडांची साथ देणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला देखील येथून तात्काळ बदली करावे अन्यथा याठिकाणी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील आठवड्यात वाकडी येथे एका मारहाणीत तलवारी काढण्यात आल्या होत्या व आता हा गोळीबार करण्यामागे नक्की हेतू काय आहे याबाबत सीबीआयने याचा तपास करावा व या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून अशा दहशत माजविणाऱ्या गावगुंडावर तडिपार करण्याची देखील कारवाई करून त्यास जिल्ह्यातून बाहेर पाठवून द्यावे अशी मागणी राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली असून भारतीय जनता पार्टीने देखील अशा लोकांना पक्षात ठेवू नये अन्यथा पक्षाचे नाव बदनाम होईल तरी अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सूचना द्याव्यात अशी मागणी देखील केली आहे. पोलिस प्रशासनाने देखील याबाबत अधिक गांभीर्याने लक्ष घालून पंढरी फडके यांच्याकडे बंदूक वापरण्याचा व चालवण्याचा परवाना होता कि नाही ? तसेच त्याच्या घरामध्ये अजूनही काही बेकायदेशीर बंदूक किंवा इतर हत्यारे आहेत कि नाही हे तपासून त्यांच्या समर्थकांकडे काही असे हत्यार आहेत का याची चौकशी करावी अन्यथा याठिकाणी निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही केवल महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment