जय संताजी तेली समाज मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा शेकडो समाजबांधवांची उपस्थिती
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल शहर त्याच बरोबर तालुक्यातील इतर ठिकाणी विखुरले गेलेले तेली समाज बांधव एकत्र येऊन स्नेहसमारंभ मोठ्या उत्साहात पनवेल येथील तेली नाका येथील शनी मंदिरात जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, पनवेल तेली समाज युवा विचार मंच,जिजाऊ महिला मंडळ पनवेल यांच्या वतीने पार पडला. या वेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभाला मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिक ,महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात करण्यात आली . त्या नंतर तेली समाजाचे संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी जय संताजी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष सतीश वैरागी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, तेली समाज आणि संताजी महाराज यांचे अतूट नाते आहे . आज समाजाची ओळख संताजी महाराजांमुळे असून तेली समाजाने नेहमी एकजुटीने राहिले पाहिजे . त्याच बरोबर समाजातील मुलांना प्रोत्साहन मिळण्याकरिता नेहमी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे असल्याचे त्यांनी म्हंटले .त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते सुनील विभुते यांनी सामाजाच्या दुर्लक्षित घटकापर्यंत जाऊन त्याच्या अडीअडचणीत मदत केली गेली पाहिजे असल्याचे नमूद केले . तसेच समाजामधील कोणालाही कुठली अडचण आल्यास अर्ध्या रात्री मदतीस धावून येणार असल्याची उपस्थितांना वचन दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोज साहू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि जीवनात नेहमी उद्दिष्ट बाळगणे गरजेचे आहे . जीवनात यशस्वी होयचे असेल तर प्रयन्त कधी सोडू नयेत . नेहमी ध्येयाचा पाठलाग केल्यास एकदिवस यश नक्की मिळत . या वर्षी जरी देशात मंदी असली तरी पुढील वर्ष हे भारताचं असून देशात मोठ्या प्रमाणात नोकरी आणि व्यवसायाच्या संधी प्राप्त होणार असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयन्त केला. या वेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. मंडळाचे अध्यक्ष सतीश वैरागी हे नुकतेच बलाढय आजारातून बरे झाले असल्याने समाजबांधवांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या . कार्यक्रमाच्या सुरवातीला महिला मंडळाचा हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला. तसेच गुणवंत विद्यर्थ्याचा सत्कार पार पडल्यावर अवघ्या २३ व्या वर्षात सीएच्या परीक्षेत चमकदार कामगिरी करून परीक्षा पास झाल्याबद्दल निखिल अनिल खोंड याचा समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रिया डिंगोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील खळदे यांनी केले. यावेळी पत्रकार प्रशांत शेडगे, गणेश महाडीक, शिवशंकर साहु, महेश साहु, ॠषीकेश खळदे, गणेश धोत्रे, तुकाराम किर्वे, रमेश जगनाडे, प्रविण धोत्रे, गजानन शेलार, अमित जगनाडे, अनिल खोंड, शुभांगी खळदे आणि शेकडो समाज बांधव या वेळी उपस्थित होते .
Comments
Post a Comment