सातारा : शहरातील मध्यरात्री दोन एटीएम फोडण्याचा भर वस्तीतील प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिलेली की मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंगळवार पेठेतील स्टेट बँकेच्या एटीएमचे तिजोरीचे कवर काढले. त्यानंतर त्याचे मॉनिटर फोडून त्याचे नुकसान केले. मात्र, चोरट्याला पैसे काढता आले नाहीत. तसेच राजधानी टॉवर्समधीलही बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.
या ठिकाणीही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. भर वर्दळीच्या ठिकाणी दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एटीएमची सुरक्षा रामभरोसी झाली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी राजधानी टॉवर येथील एटीएमला सुरक्षा रक्षक नेमण्यात आला होता. मात्र, सध्या या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने अशा प्रकारच्या घडत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दोन्ही एटीएममधील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून, दोन ते तीनजण सीसीटीव्हीत दिसत आहेत. सीसीटीव्ही फूटेजवरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment