पनवेल : खारघरमधील विविध प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी सोमवार भाजपच्या वतीने खारघर येथील सिडको कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आदी समस्या सोडवा अन्यथा येथुन हलणार नाही . असा पवित्रा घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी सिडको कार्यालयातच ठिय्या मांडला . पावसाळ्यानंतर मैदान व उद्यानातील गवत कापणे काम , ड्रेनेज लाईन साफ करणे , पदपथावर तुटलेली झाकणे , दिवाबत्ती या प्रश्नाकडे सिडकोचे अधिकारी डोळेझाक करतात . सिडकोच्या झोपलेल्या प्रशानाला जागे करण्यासाठी खारघर भाजपाचे सर्व पदाधिकारीही सिडको कार्यालयात शिरले व तसेच अधिकाऱ्यांना धारेवर धरले .
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल , स्थायी समिती सभापती प्रविण पाटील , नगरसेवक नरेश पाटील , महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील , नगरसेविका आरती नवघारे , हर्षदा उपाध्याय , अनिता पाटील व बिना गोगारी याच्यासह पदाधिकारी समीर कदम , संजय शिंदे , गुरुनाथ म्हात्रे , साजिद पटेल , मोना अडवाणी , गीता चौधरी , शत्रुघ्न काकडे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment